वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर कार आणि ट्रकची भीषण धडक होऊन एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. यामध्ये 20 वर्षीय तरुणीची प्रकृती गंभीर आहे. लोहाराजवळ संध्याकाळी हा अपघात घडला आहे.
मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या सिन्हा कुटुंबाच्या कारला नागपूर लेनवर समोर जाणाऱ्या ट्रकने धडक दिली. कार चालकाला डुलकी लागल्याने भरधाव कार ट्रकवर मागून आदळल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर कार महामार्गाच्या बाजूला असलेल्या स्टील गार्डला धडकली. या भीषण अपघातात कारचालक विकास सिन्हा आणि एका वृद्ध महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अनया सिन्हा (20), आनंदा सिन्हा आणि युवा सिन्हा (10) हे तिघे जखमी झाले आहेत. गंभीर जखमी अनयासह तिघांनाही पुढील उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या कारमधील कुटुंब सिन्हा हे मुंबईतील रहिवाशी होते. या कुटुंबातील पाच सदस्य मुंबईहून नागपूरकडे जात असताना हा भीषण अपघातात झाला. वाशिमच्या वनोजा ते कारंजा दरम्यानच्या लोहारा जवळ विकास सिंग यांना डुलकी लागली आणि हा भीषण अपघात झाला.
दरम्यान याच महिन्यांच्या 23 नोव्हेंबरला समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास चाणक्य ट्रॅव्हल्सच्या बसला भीषण अपघात झाला. या अपघाताचेही कारण चालकाला डुलकी लागल्याने झाला होता. यातही दोन निष्पाप प्रवाशांचा जीव गेला तर 30 जण जखमी झाले होते.
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra - A major accident was reported once again on the Samruddhi Mahamarg near Harsul-Sawangi in Chhatrapati Sambhajinagar district. The accident occurred on the Mumbai corridor of the expressway at Channel No. 426, where a private passenger bus met with an accident under circumstances that are yet to be ascertained, one person lost their life in the crash. As many as seven to eight passengers sustained serious injuries, while 15 to 16 others suffered minor injuries.
— NextMinute News (@nextminutenews7) November 23, 2026
सावंगी परिसरातील चॅनेल क्रमांक 426 जवळ रात्री 1 वाजेच्या सुमारास चालकाला अचानक डुलकी लागल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर भरधाव बस पुलाच्या कठड्यावर जोरात आदळून जागेवरच पलटी होऊन अपघात झाला. ज्या पुलावर ही बस पलटी झाली, त्याच्या बाजूला अवघ्या काही फुटांवर खोल खाई होती, नशिबाने मोठी जीवितहानी टळली.