• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /सरकारने गुपित ठेवलेली गोकुळच्या 4 संचालकांची नावं सतेज पाटील यांनी भर सभेत फोडली; एकही व्यक्ती कोल्हापुरची नाही

सरकारने गुपित ठेवलेली गोकुळच्या 4 संचालकांची नावं सतेज पाटील यांनी भर सभेत फोडली; एकही व्यक्ती कोल्हापुरची नाही

सतेज पाटील यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्य सरकारने गुपित ठेवलेली चारही नावं भर सभेतच फोडली आहेत. एकही व्यक्ती कोल्हापुरची नाही असा दावा त्यांनी केला आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 09, 2026, 17:34 IST|Updated: Nov 09, 2026, 17:43 IST
joinshare
सरकारने गुपित ठेवलेली गोकुळच्या 4 संचालकांची नावं सतेज पाटील यांनी भर सभेत फोडली; एकही व्यक्ती कोल्हापुरची नाही

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

गोकुळ निवडणूक :  गोकुळच्या वादामुळे महाराष्ट्रात राजाकरण पेटले आहे.  गोकुळच्या 4 संचालकांच्या नियुक्तीवरून कोल्हापुरातील राजकारण चांगलंच तापल आहे. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या 4 संचालकांविरोधात सतेज पाटील यांनी तीव्र आंदोलन करत मोठा गौप्यस्फोट केला. सरकारने गुपित ठेवलेली गोकुळच्या 4 संचालकांची नावं सतेज पाटील यांनी भर सभेत फोडली आहेत. एकही व्यक्ती कोल्हापुरची नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

गोकुळ अध्यक्षपदावरून राजकीय संघर्ष शिगेला पोहचला आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वात कोल्हापुरात संघर्ष मोर्च काढण्यात आला. यावेळी सतेज पाटील यांनी  सरकारने गुपित ठेवलेली चारही नावं जाहीर केली. त्यापैकी एक संचालक सांगलीतील असल्याचा दावा त्यांनी केला. 

कोल्हापुरात तज्ज्ञ माणूस मिळाला नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सांगलीतील व्यक्तीची नियुक्ती म्हणजे गोकुळला अमूलच्या दावणीला बांधण्याची सुरुवात असल्याचा गंभीर आरोप सतेज पाटील यांनी केला. 1400 संचालकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा षडयंत्र रचण्यात आले. त्या मागे सदृश्य शक्ती म्हणण्यात आले. सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले अदृष्य सक्ती कोण हे बोलायचे धाडस हसन मुश्रीफ यांना झालेलं नाही असं सतेज पाटील म्हणाले. 

चार संचालक यांना अधिकार देण्यासाठी मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील जबाबदार. ते दोघे हे पाप करत आहेत.  अध्यादेश झाला, पण GR मिळाला नाही. आम्ही शोधून काढले असं म्हणत सतेज पाटील यांनी संचालकांची नावे जाहीर केली.  तज्ञ संचालक म्हणून शिवाजी दिनकर पाटील, ड्रॉ. प्रवीण हेंद्रे, कृष्णात पाटील, वकिल प्रशांत पाटोळे यांना नियुक्ती केल्याचा दावा  सतेज पाटील यांनी केला. 

सांगलीचा माणूस देण्यात आला. कोल्हापुरात तुम्हाला एक माणूस मिळू शकलेला नाही.  गोकुळ आत्ता अमूलच्या खशात घालण्याचे षडयंत्र आखले जात आहे. त्याची सुरुवात सांगलीच्या संचालक निवडूण झाली आहे.  सरकारकला विनंती आहे की तुम्ही नेमलेले 5 लोक पाठवू नका.  तुमचे 12 संचालक पाठवा आणि निवडणूक होवू द्या.  मी लढाई करायची असेल तर लढाई करतो. समोर येवून लढतो, पाठीत खंजीर खुपसत नाही.  या चार लोकांच्या पुढे म्हस आणि गाय उभी केली तर ते ओळखू शकत नाही असा टोला सतेज पाटील यांनी लगावला.  लढाईची सुरुवात केली आहे. त्यामुळे तुम्ही अन्याय करू नका.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Kolhapur
Maharashtra Politics
Indian Politics