SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

ठाणे - प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येचं नेमकं कारण अखेर आलं समोर; आरोपीने दिली कबुली, 'त्या नगरसेवकाच्या...'

ठाण्यातील ठाकरे गटाचे शाखाप्रमुख आणि विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. हत्येचं नेमकं कारण काय आहे यासंदर्भात आरोपींनीच कबुली दिली आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 19, 2026, 06:10 PM IST | Updated: Oct 19, 2026, 06:19 PM IST
Image Credit: प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येचं नेमकं कारण अखेर आलं समोर
Join

ठाण्यातील ठाकरे गटाचे शाखाप्रमुख आणि विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. हत्येचं नेमकं कारण काय आहे याचा उलगडा आता स्वत: आरोपीने केला आहे. आरोपीने कोर्टात यासंदर्भात कबुली दिली आहे. एका नगरसेवकाच्या वादातून ही हत्या झाल्याचं आरोपीने कबूल केल्याचं वकिलांनी म्हटलं आहे. कबुली जबाबात कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही, तर फक्त नगरसेवकाच्या वादाचा उल्लेख आहे.

आज संतोष कनोजिया आणि अमित सिंह यांना कोर्टात रिमांडसाठी हजर करण्यात आले होते. गेल्या सोमवारी 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. आज कोर्टाने त्यात आणखी चार दिवसांची वाढ केली आहे, आता त्यांची पोलीस कोठडी 22 तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे.  युक्तिवादादरम्यान UP STF (स्पेशल टास्क फोर्स) समोर आरोपीने दिलेली कबुली जबाबाची कॉपी आम्ही कोर्टात सादर केल्याचं वकील समीर हाटले यांनी सांगितलं.

त्या कबुली जबाबाच्या शेवटच्या पॅराग्राफमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की, ही हत्या एका नगरसेवकाच्या वादावरून करण्यात आली आहे. हे सोशल मीडियावर पण फिरत आहे. तीच गोष्ट गृहीत धरून कोर्टाने हा तपास पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. कोर्टासमोर आता एक नवीन कागदपत्र आलं आहे.  या प्रकरणी प्रयागराज कोर्टात फाईल केलेले रिमांड रिपोर्ट देखील आम्ही कोर्टात सादर करणार आहोत असं त्यांनी सांगितलं.

हे ही वाचा - 'ठाण्यात घराजवळ असलेल्या पूर्णेकर कुटुंबीयांना भेटायला वेळ नाही, पण...', टायगर श्रॉफ भेटीवरुन पूर्णेकर कुटुंबाचा संताप, '19 दिवसांनीही...'

त्या कबुली जबाबात कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही, फक्त नगरसेवकाच्या वादाचा उल्लेख आहे.  पोलिसांनी कोर्टासमोर काही अत्यंत गोपनीय कागदपत्रं सादर केली आहेत, जे फक्त कोर्ट आणि IO तपास अधिकारी यांनीच पाहिले आहेत. त्यांचा रिमांड रिपोर्टमध्ये उल्लेख नाही. महत्त्वाचे पुरावे थेट कोर्टालाच दाखवण्यात आले आहेत, पब्लिक किंवा आम्हालाही दाखवले गेले नाहीत असंही त्यांनी सांगितलं. 

पूर्णेकर हत्येप्रकरणी राजेंद्र शिंदे यांची तिसऱ्यांदा चौकशी

दरम्यान पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची तिसऱ्यांदा चौकशी करण्यात आली. जवळपास पावणेसात तास त्यांची चौकशी करण्यात आली खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात ही चौकशी सुरु होती. चौकशीदरम्यान आरोपी संतोष कनोजिया आणि अमित सिंग यांनाही समोरासमोर बसवण्यात आलं होते. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES