• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /ठाणे
  • /ठाणे शहरातील डेटा सेंटर आणि रिंग मेट्रोचा फेरविचार करा, आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

ठाणे शहरातील डेटा सेंटर आणि रिंग मेट्रोचा फेरविचार करा, आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

Thane News : ठाण्यात अ‍ॅमेझॉन एआय डेटा सेंटरसह रिंग मेट्रो आणि पॉड ट्रान्सपोर्ट प्रकल्प राबवले जाणार आहेत. मात्र हे प्रकल्प राबवत असताना पर्यावरणीय परिणामांचा आणि नागरी परिणामांचा विचार करावा यासाठी शिवसेना उद्धव गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे.

Reported Bypooja pawar
Published: Oct 02, 2026, 09:40 AM IST|Updated: Oct 02, 2026, 10:34 AM IST
joinshare
ठाणे शहरातील डेटा सेंटर आणि रिंग मेट्रोचा फेरविचार करा, आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Thane News : ठाणे शहरातील प्रस्तावित अ‍ॅमेझॉन एआय डेटा सेंटरसह रिंग मेट्रो आणि पॉड ट्रान्सपोर्ट प्रकल्प राबवताना पर्यावरणीय परिणामांचा आणि नागरी परिणामांचा फेरविचार करावा अशी मागणी शिवसेना उद्धव गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. आदित्य यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना या संदर्भातील पत्र पाठवलं असून यामाध्यमातून प्रकल्पाबाबतीत स्वतंत्र पर्यावरणीय आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्याची तसेच  नागरिकांच्या सहभागातून पारदर्शक प्रक्रिया राबविण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. ठाण्यातील र्यावरणीय, नागरी आणि पायाभूत सुविधांवर दीर्घकालीन परिणाम करणारे प्रकल्प अजून प्रस्तावित आहेत त्यामुळे या प्रकल्पांबाबत निविदा प्रक्रिया पुढे नेण्यापूर्वी त्यांचे सर्वंकष मूल्यमापन होणे आवश्यक असल्याचे ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

डेटा सेंटरबाबत काय आक्षेप :

ठाण्यातील बाळकूम येथे प्रस्तावित असलेल्या अ‍ॅमेझॉन एआय डेटा सेंटरमुळे पाणी, वीज, वाहतूक, ध्वनी, उष्णता, पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यावर जाणाऱ्या संभाव्य परिणामांचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी आपल्या पात्रातून मुख्यमंत्र्यांना केली आहे. ठाणे शहरावर यापूर्वीच पाणी, वाहतूक आणि पायाभूत सुविधांचा ताण आहे. त्यामुळे डेटा सेंटरसाठी पर्यावरणीय आणि पायाभूत सुविधा सक्षम असलेल्या अन्य योग्य ठिकाणाचा पर्याय गांभीर्याने तपासावा असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे.

5 हजार झाड तोडणार?

ठाण्यातील प्रस्तावित रिंग मेट्रो आणि पॉड ट्रान्सपोर्ट प्रकल्पांमुळे सुमारे पाच हजार झाडे, कांदळवन आणि पर्यावरणावर होणाऱ्या संभाव्य परिणामांची स्वतंत्र तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतुकीला विरोध नसून पर्यावरणीय हानी टाळून अधिक परिणामकारक वाहतूक नियोजन करण्याची गरज असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. मेट्रो 4 आणि मेट्रो 5 या प्रकल्पांना प्राधान्याने पूर्ण करून सध्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी. त्यानंतरच अतिरिक्त वाहतूक प्रकल्पांची आवश्यकता आणि पर्यावरणीय परिणामांचा फेरविचार करावा, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली आहे.

नागरिकांना विश्वासात घेऊन मतं जाणून घ्या :

ठाण्यात होणाऱ्या सदर प्रकल्पांबाबत नागरिकांच्या अनेक हरकती, सूचना आणि तक्रारी जाणून घ्या असे देखील आदित्य ठाकरे यांनी पत्रातून सांगितलं आहे. पाणी, पर्यावरण, वाहतूक, सार्वजनिक आरोग्य, वीज आणि पायाभूत सुविधांवरील परिणामांचे स्वतंत्र आणि सर्वकष मूल्यांकन सार्वजनिक करावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
News in Marathi
Marathi News
Thane
Aaditya Thackeray
Devendra Fadnavis