SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

कानाखाली मारल्या, केस ओढले, महिलांना रस्त्यावर पाडलं अन्... शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यांवर राडा; ठाण्यातील धक्कादायक Videos

ठाण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या या ठिकाणी अचानक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीतील कार्यकर्त्या दाखल झाल्या आणि त्यांनी मारहाण सुरु केली. नेमका हा प्रकार काय जाणून घ्या...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 13, 2026, 08:45 IST | Updated: Nov 13, 2026, 09:20 IST
Image Credit: नेमकं यामागील कारण काय? नक्की झालं काय?
Join

ठाणे शहराची ओळख असलेल्या आणि शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मासुंदा तलाव परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी कथित अनैतिक व्यवसाय करणाऱ्या महिलांना सत्ताधारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या गटातील महिलांनी मारहाण केली आहे. अचानक शिंदे गटाच्या महिला आघाडीने या महिलांना पकडून मारहाण करण्यास सुरुवात केल्याने काहीकाळ या ठिकाणी गोंधळ उडाला. 

केस ओडले, रस्त्यावर पाडलं अन्...

ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात कथित अनैतिक व्यवसायासाठी ग्राहकांच्या शोधात असलेल्या महिलांना शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीकडून रस्त्यावर मारहाण करण्यात आली. शिंदे सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी या महिलांना कानशीलात लगाल्या. त्यांचे केस खेचले. तसेच काठ्यांनीही त्यांना मारहाण केल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. अगदी काही महिलांना रस्त्यावर, फुटपाथवर पाडून मारहाण करण्यात आल्याचं या व्हिडीओंमध्ये दिसत आहे.

मारहाण करण्याआधी विचारला जाब

ज्या महिलांना ही मारहाण करण्यात आली त्यांना शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या तुम्ही इथं काय करत आहात असा जाब विचारत असल्याचं दिसत आहे. या महिला अनैतिक व्यवसायासाठी या गजबजलेल्या परिसरामध्ये ग्राहकांच्या शोधात फिरत असतात. त्यामुळेच इतक्या रात्री या तलावाच्या आजाबाजूच्या कठड्यांवर बसून तुम्ही नेमकं काय करताय असा सवाल विचारत या महिलांना समाधानकारक उत्तर न देता आल्याने मारहाण करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. एका महिलेला एकाच वेळी अनेकांनी मारहाण केल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. या ठिकाणी तुम्ही पुन्हा दिसलायला नको, उद्यापासून इथे दिसलात तर बघाच, असा इशारा मारहाण करणाऱ्या महिलांनी दिल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. 

नागरिकांकडून तक्रार

मासुंदा तलाव परिसरातील स्थानिक नागरिकांकडून वारंवार या अनैतिक व्यवहारांसंदर्भातील तक्रारी करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा दावा केला जात आहे. प्रशासनाने दखल घेतली नसल्याने महिला आघाडीने स्वतः कारवाई केल्याची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांकडे नोंदवली आहे. मात्र, या मारहाणीत शिवसेनेच्या काही पुरुष कार्यकर्त्यांनीही महिलांवर हात उचलल्याचे व्हिडिओतून समोर आले आहे. त्यामुळे अशाप्रकारे कायदा हातात घेण्याचा अधिकार शिंदेंच्या कार्यकर्त्यांना कोणी दिला असा सवालही उपस्थित केला जात आहे. 

मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थानापासून अवघ्या दोन किलोमीटरवर असलेल्या या भागामध्ये अशाप्रकारे सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच या बेकायदेशीर व्यवसायासंदर्भात कायदा हातात घेईपर्यंत पोलीस प्रशासन काय करत होते? असा सवाल विचारला जात आहे. अनेकदा स्थानिकांनी तक्रारी केल्यानंतरही कारवाई का करण्यात आली नाही? असा सवालही उपस्थित होतोय. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES