SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

फक्त 60 मिनिटांसाठी उघडला शेअर बाजार; मुहूर्त ट्रेडिंगला बीएसईमध्ये प्रचंड मोठी उलथापालथ, गुंतवणूकदारांना जबरदस्त झटका

दिवाळीची सुट्टी असूनही शेअर बाजार फक्त एकातासाकरिता उघडला होता. दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर शेअर बाजारात आज विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र पार पडले. लाल निशाणासह मार्केट बंद झाले.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 08, 2026, 17:33 IST | Updated: Nov 08, 2026, 17:45 IST
Join

शेअर बाजार : दिवाळीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असताना देखील आज 8 नोव्हेंबर रोजी फक्त 60 मिनिटांसाठी शेअर बाजार उघडला होता.  दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर भारतीय शेअर बाजारात आज विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र पार पडले. मुहूर्त ट्रेडिंगला बीएसईमध्ये प्रचंड मोठी उलथापालथ झाली.  दिवाळी मुहूर्ताच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये घरसण पहायला मिळाली. यामुळे गुंतवणूकदार नाराज झाले.  

भारतीय शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगला विशेष महत्त्व आहे. या परंपरेनुसार गुंतवणूकदार नवीन वर्षाची सुरुवात शेअर्सच्या खरेदी-विक्रीने करता. मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसईमध्येही मुहूर्त ट्रेडिंगनिमित्त विशेष सत्राचे आयोजन केले जाते. दरवर्षी प्रमाणे यंदाही बीएसईमध्येही मुहूर्त ट्रेडिंग झाले. 
 

यंदा बीएसईमध्येही मुहूर्त ट्रेडिंगचा वेळ दुपारचा होता. दुपारी 2 वाजून 5 मिनिटांनी प्री-ओपन सत्राला सुरुवात झाली. दुपारी 2 वाजून 20 मिनिटांपासून प्रत्यक्ष मुहूर्त ट्रेडिंग सुरू झाले. हे विशेष ट्रेडिंग सत्र दुपारी 3 वाजून 30 मिनिटांपर्यंत सुरू होते. 

दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगची सुरुवात सकारात्मक

8 नोव्हेंबर 2026 रोजी दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगची सुरुवात सकारात्मक झाली. सेन्सेक्स 234.10 अंकांनी, म्हणजेच 0.29 टक्क्यांनी वाढून 81,262.12 अंकांवर उघडला, तर निफ्टी 50 41.50 अंकांनी, म्हणजेच 0.17 टक्क्यांनी वाढून 25,071.85 अंकांवर पोहोचला.

सेन्सेक्स 28.62 अंकांनी, म्हणजेच 0.04 टक्क्यांनी घसरून 80,999.40 वर बंद झाला. दरम्यान, निफ्टी 50 43.95 अंकांनी, म्हणजेच 0.18 टक्क्यांनी घसरून 24,986.40 वर बंद झाला. निफ्टीचा निर्देशांक 25,000 अंकानी घसरला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये वाढ

मुहूर्त ट्रेडिंगमध्ये मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये तेजी पहायला मिळाली.  निफ्टी मिडकॅपचा निर्देशांक 100 अंकांनी वाढून 60706  अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी स्मॉलकॅपचा निर्देशांक 185 अंकांनी वाढून 19160 अंकांवर बंद झाला. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांकात एमसीएक्स, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस आणि अशोक लेलँड यांच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये  आरआरकेएबीईएल, टीडी पॉवर सिस्टीम्स आणि नेटवेब यांच्या शेअर्समध्ये 5 ते 80 टक्क्यांची वाढ दिसून आली.

फार्मा आणि मीडिया कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ 

मुहूर्त ट्रेडिंगमध्ये व्यवहारादरम्यान निफ्टीच्या निर्देशांकाेन गुंतवणूकरादारांना काहिसा दिलासा दिला. यात 1.84 टक्केची वाढ झाली. निफ्टी फार्मा 1.70 टक्केने वाढला, त्याखालोखाल निफ्टी हेल्थकेअरमध्ये 1.46 टक्के आणि निफ्टी मेटलमध्ये 0.36 टक्केची वाढ झाली.

रिअल इस्टेट आणि वित्तीय क्षेत्रातील शेअर्सवर दबाव

मुहूर्त ट्रेडिंगमध्ये  रिअल इस्टेट आणि वित्तीय क्षेत्रातील शेअर्सवर दबाव पहायला मिळाला.  निफ्टी रियल्टीचा निर्देशांक 0.66 टक्क्यांनी घसरला. निफ्टी बँकचा निर्देशांक देखील 0.40 टक्केने घसरला. दरम्यान, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस 0.38 टक्के आणि निफ्टी आयटी 0.33 टक्के घसरणीसह बंद झाला.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES