• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /आमदार विश्रामगृहात कांड! आमदाराच्या रुममध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळले तरुण-तरुणी; विधानसभा सचिवांकडे तक्रार, कोण आहे हा नेता?

आमदार विश्रामगृहात कांड! आमदाराच्या रुममध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळले तरुण-तरुणी; विधानसभा सचिवांकडे तक्रार, कोण आहे हा नेता?

आमदारासाठी आरक्षित असलेल्या खोलीत एक तरुण आणि एक तरुणी आढळल्याचा आरोप होक आहे. आमदार अचानक तिथे पोहोचताच हे दोघेही तिथून पळून गेले.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 08, 2026, 10:04 IST|Updated: Nov 08, 2026, 10:11 IST
joinshare
आमदार विश्रामगृहात कांड! आमदाराच्या रुममध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळले तरुण-तरुणी; विधानसभा सचिवांकडे तक्रार, कोण आहे हा नेता?
Image Credit: आमदाराच्या रुममध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळले तरुण-तरुणी

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

आमदारांच्या विश्रामगृहातील एका खोलीत तरुण आणि तरुणी आक्षेपार्ह स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात विधानसभा सचिवालयाकडे रितसर तक्रारही नोंदवण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे. आमदारांसाठी आरक्षित असलेल्या एका खोलीत अशाप्रकारे तरुण आणि तरुणी आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये हा प्रकार घडला आहे.

नेमकी घटना काय?

काँग्रेसचे आमदार दिनेश जैन बोस यांच्यासाठी आरक्षित असलेल्या खोलीत, त्यांच्या अनुपस्थितीत एक तरुण आणि एक तरुणी आढळले असा आरोप आहे. आमदार अचानक तिथे पोहोचताच हे दोघेही तिथून पळून गेले. कोणाचीही अधिकृत परवानगी न घेता खोलीची चावी इतरांकडे सोपवली असा आमदारांचा आरोप आहे. आमदारांनी यासंदर्भात विधानसभा सचिवालयाकडे तक्रार नोंदवली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे. यानंतर भोपाळ येथील आमदारांच्या विश्रामगृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

महिदपूरचे काँग्रेस आमदार दिनेश जैन बोस यांनी आरोप केला आहे की, ते बाहेर असताना त्यांच्यासाठी आरक्षित असलेल्या खोलीत एक तरुण आणि एक तरुणी आक्षेपार्ह स्थितीत होते. आमदार अचानक तिथे पोहोचताच ते दोघेही तिथून पळून गेले. या घटनेनंतर, त्यांनी विधानसभा सचिवालयाकडे तक्रार दाखल करून, या प्रकरणाची चौकशी करण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आमदार निवासच्या ब्लॉक 3 मध्ये ही घटना घडली. आमदार दिनेश जैन बोस यांनी दिलेल्या  माहितीनुसार, दिल्लीहून परतल्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ते या विश्रामगृहात पोहोचले.  त्यांना 14 आणि 15 क्रमांकाच्या खोल्या देण्यात आल्या होत्या. तिथे पोहोचल्यावर त्यांनी केअरटेकरकडे 15 क्रमांकाच्या खोलीची चावी मागितली, परंतु ती उपलब्ध नसल्याने त्यांना 14 क्रमांकाच्या खोलीची चावी देण्यात आली.

आमदारांचा आरोप आहे की, जेव्हा ते 14 क्रमांकाच्या खोलीत गेले, तेव्हा त्यांना शेजारील 15 क्रमांकाच्या खोलीत एक तरुण आणि एक तरुणी आक्षेपार्ह स्थितीत आढळले. त्यांना पाहताच ते दोघेही तिथून पळून गेले. आपल्याला दिलेल्या जागेत अनोळखी व्यक्तींना पाहून आमदारांनाही काही काळ आश्चर्याचा धक्का बसला.

रिसेप्शनवर चावी ठेवल्याबाबतचा आरोप

दिनेश जैन बोस यांनी नमूद केले आहे की, त्यांच्या खोलीची चावी रिसेप्शन काउंटरवर असते. केअरटेकरने त्यांच्या किंवा त्यांच्या वैयक्तिक सहाय्यकाच्या (PA) माहितीशिवाय किंवा परवानगी न घेता कोणाला तरी खोलीत प्रवेश दिला. आपल्या नावावर असलेल्या खोलीत त्यांच्या परवानगीशिवाय दुसऱ्या व्यक्तीला प्रवेश कसा दिला गेला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

या घटनेनंतर, आमदारांनी केअरटेकर आणि रिसेप्शन कर्मचाऱ्यांकडे तक्रार नोंदवली. हा संपूर्ण प्रकार गंभीर बाब असल्याचं सांगत त्यांनी आमदारांच्या विश्रामगृहात (MLA rest house) वाटप केलेल्या खोल्यांच्या सुरक्षेबाबत आणि वापराबाबत जबाबदारी निश्चित केली जाणे आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.

विधानसभा सचिवालयाला पत्र; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चौकशी सुरू

आमदारांनी विधानसभा सचिवालयाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर, विधानसभा सचिवालयाने हे प्रकरण चौकशीसाठी आणि आवश्यक कार्यवाहीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) सोपवले आहे.

विधानसभेचे जनसंपर्क अधिकारी (PRO) महावीर सिंग यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, हे प्रकरण आमदारांच्या अतिथीगृहातील (Legislators' Guest House) 'ब्लॉक-3' शी संबंधित आहे. आमदारांनी विधानसभा सचिवालयाच्या प्रधान सचिवांकडे पत्र सादर केले असून, सार्वजनिक बांधकाम विभाग सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
congress