• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /'दिवाळी हा मानवनिर्मित रोग', काँग्रेस खासदाराचं वादग्रस्त विधान; 'हे लोक मानसिकदृष्ट्या...'

'दिवाळी हा मानवनिर्मित रोग', काँग्रेस खासदाराचं वादग्रस्त विधान; 'हे लोक मानसिकदृष्ट्या...'

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देताना 'दिवाळी म्हणजे खुशियों की ईद (आनंदाची ईद)' असं म्हटल्याने नवीन वाद निर्माण झालेला असतानाच आता एका काँग्रेस खासदाराने दिवाळीबद्दल वादग्रस्त विधान केलंय.

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 10, 2026, 10:34 IST|Updated: Nov 10, 2026, 10:47 IST
joinshare
'दिवाळी हा मानवनिर्मित रोग', काँग्रेस खासदाराचं वादग्रस्त विधान; 'हे लोक मानसिकदृष्ट्या...'
Image Credit: वायू प्रदुषणासंदर्भात बोलताना केलं विधान (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या रजधानीचं शहर असलेल्या दिल्लीसोबतच एनसीआरमधील प्रदूषण चर्चेचा विषय ठरत असतानाच याच विषयावर बोलताना काँग्रेस खासदाराने एक वादग्रस्त विधान केलं आहे. काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनी दिवाळीला 'मानवनिर्मित रोग' म्हटलं आहे. सहारनपूरचे काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी दिवाळीनंतर दिल्ली आणि एनसीआर परिसरात झालेल्या वायू प्रदुषणावर भाष्य करताना हे विधान केलंय. "दिवाळी असो वा प्रदूषण, हे सारे मानवनिर्मित रोग आहेत," असं इम्रान मसूद यांनी म्हटलं आहे. त्यांनी प्रदूषणाचा सामना करण्यासाठी लोकांनीच आत्मजागरूक राहण्याची गरज असल्याचं नमूद केलं आहे.

सरकार फार काही करु शकत नाही

वायू प्रदुषणाची समस्या गंभीर असल्याचं सांगताना इम्रान मसूद यांनी केवळ सरकारला दोष देऊन किंवा सरकारी उपाययोजनांवर अवलंबून राहून हा प्रश्न सुटणार नाही, असं म्हटलं आहे. "हे लोक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहेत. ते फक्त नकारात्मक गोष्टी बोलतात," असा टोला इम्रान मसूद यांनी फटाकेबंदीला विरोध करणाऱ्यांबद्दल बोलताना लगावला. सरकार आमचे असो किंवा त्यांचे सरकार या समस्यांवर फार काही करू शकणार नाही. लोकांनीच स्वत: याबद्दल जागृक होण्याची गरज असल्याचं इम्रान मसूद यांनी आवर्जून नमूद केलं.

लोकांनाच जागरूक व्हावं लागेल

काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनी, "दिवाळी असो वा प्रदूषण, हे दोन्ही मानवनिर्मित रोग आहे," असं म्हणताच प्रदूषण कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता याबद्दल भाष्य केलं आहे. प्रदूषणाची समस्या कमी करायची असेल तर जनजागृती करणं अधिक महत्त्वाचं असल्याचं इम्रान मसूद म्हणाले. "लोकांना जागरूक व्हावे लागेल. त्यांचे सरकार असो वा आमचे, सरकार या बाबतीत फार काही करणार नाही. लोकांना जागरूक व्हावे लागेल," असं इम्रान मसूद म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देताना 'दिवाळी म्हणजे खुशियों की ईद (आनंदाची ईद)' असं म्हटल्याने वाद निर्माण झाला होता. त्यात आता या नव्या वादाची भर पडली आहे.

दिल्लीतील हवेची परिस्थिती धोकादायक

राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषण आणि हवेच्या गुणवत्ता निर्देशांक खालावला असून परिस्थिती चिंताजनक झाली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) मंगळवार, 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, राजधानीतील अनेक भागांमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 300 च्या वर दर्शवत आहे. हवेचा सर्वात वाईट दर्जा चांदणी चौकात असून इथे एक्यूआय 400 वर पोहोचलाय.

निवडणूक आयोगाला टोला

काँग्रेस खासदाराने निवडणूक आयोगावर टीका करताना, "निवडणूक आयोग कोंडीत सापडला असून, घाबरून वारंवार आपले आदेश मागे घेत आहे," असं म्हटलं. तसेच, मसूद यांनी आयोगाने जनतेचा आवाज दाबल्याचा आरोपही केला.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
congress
india