• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /'सिग्नल लाल, इमर्जन्सी ब्रेक...', लोको पायलटच्या केबिनमधील थरारक Video समोर, ...म्हणून एक्स्प्रेस पलटी

'सिग्नल लाल, इमर्जन्सी ब्रेक...', लोको पायलटच्या केबिनमधील थरारक Video समोर, ...म्हणून एक्स्प्रेस पलटी

कोलकाताहून मिझोरामला जाणाऱ्या सैरंग एक्स्प्रेसला गुवाहाटीजवळ अपघात झाला. या अपघाताच्या पूर्वीचा लोको पायलटच्या केबिनमधील एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 11, 2026, 19:34 IST|Updated: Nov 13, 2026, 12:28 IST
joinshare
'सिग्नल लाल, इमर्जन्सी ब्रेक...', लोको पायलटच्या केबिनमधील थरारक Video समोर, ...म्हणून एक्स्प्रेस पलटी
Image Credit: Assam Railway Accident

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

बुधवारी सकाळी सैरंग एक्स्प्रेस कोलकाताहून मिझोरामला जात असताना गुवाहाटीजवळ भीषण अपघात झाला. रेल्वेचे इंजिनसह पाच डबे रुळावरून घसरले. प्रवाशी झोपते असताना अचानक झालेल्या अपघातामुळे एकच भीतीदायक वातावरण पसरलं. सुदैवाने या अपघातात सर्व प्रवासी सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण  या एक्स्प्रेसला भीषण अपघात होण्यापूर्वीचा लोको पायलटच्या केबिनमधील थरारक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात या एक्स्प्रेस वेला अपघात होण्यामागील कारण स्पष्ट होतंय.

 

At least six coaches of the Kolkata–Sairang Express (13125) derailed at Digaru station near Guwahati, Assam, around 6.54am Wednesday. The loco pilot reportedly failed to control the train's speed while allowing another train to pass. https://t.co/B4hbIKKcSS

— Arvind Chauhan (@Arv_Ind_Chauhan) November 11, 2026

 

या व्हिडीओमध्ये रेल्वेच्या अपघात होण्यापूर्वी काही क्षणापूर्वी काय घडलं हे दिसतंय. या लोकोमोटिव्हच्या आतून रेकॉर्ड केलेल्या फुटेजमध्ये ऐकू येत आहे की, तो म्हणतोय सिग्नल लाल होता आणि आपत्कालीन प्रणाली काम करत नाहीय.


रेल्वेच्या अपघातापूर्वी नेमकं काय झालं आहे, याबद्दल या व्हिडीओमधून काही प्रमाणात स्पष्टता येत आहे. पण या कथित व्हिडीओची रेल्वेकडून अधिकृत पुष्टी आलेली नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लोको पायलट हा प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत पाहिला मिळतोय. व्हिडीओनुसार, ट्रेन रुळावरून घसरण्यापूर्वी लोको पायलट वारंवार सांगत होती की, ‘सिग्नल रेड आहे… इमर्जन्सी ब्रेक लावलेला आहे पण तो काम करत नाहीये. इथे काहीच काम करत नाहीय.’  या व्हिडीओमधील ऑडिओवरून एवढं तर लक्षात आलं की, ट्रेन थांबवण्यात तांत्रिक अडचण येत होती. त्यानंतर काही सेकंदांतच जोरदार आवाज येतो आणि तेच ट्रेन एका बॅरिकेडला धडकून रुळावरून घसरल्याचं पाहिला मिळतं. 

नक्की दुर्घटना कशी घडली?


'टाइम्स ऑफ इंडिया' मधील वृत्तानुसार, ही दुर्घटना बुधवारी सकाळी 6.54 मिनिटांच्या सुमारास घडल्याचे वृत्त समोर आलं. पूर्वोत्तर सीमांत रेल्वे (NFR) ने दिलेल्या माहितीनुसार, डिगारू स्थानकावर दुसऱ्या ट्रेनला प्राधान्य देऊन मार्गस्थ करण्यासाठी या एक्स्प्रेसला थांबा दिला गेला होता. पण लोको पायलटला ट्रेनची गती नियंत्रित करता आली नाही आणि क्षणात भीषण अपघात झाला. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.  

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Breaking News
Accident