तुमची गर्लफ्रेंड आता कुठेय? राहुल गांधी प्रश्न ऐकताच हसले अन् उत्तर देत म्हणाले, 'ती आता...'
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. ते म्हणजे त्यांनी शेअर केलेला एक खासगी किस्सा
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचं आत्मचरित्र 'बिलोंगिगः अ जर्नी ऑफ लव' या पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील एक किस्सा सांगितला. राहुल गांधी यांनी कार्यक्रमात त्यांच्या गर्लफ्रेंडचा उल्लेख करत एक आई-बाबांच्या आठणींना उजाळा दिला. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर एक त्यांची गर्लफ्रेंड कोण? हा प्रश्न चर्चेत आला आहे. तर, राहुल गांधींनीही यावर मिश्किल उत्तर दिलं आहे.
सोमवारी पार पडलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राहुल गांधींनी सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांच्याशी संबंधित एक किस्सा शेअर केला आहे. ते म्हणाले की, आई-वडिलांची भेट ज्या केंब्रिजमधील 'व्हर्सिटी' रेस्टॉरंटमध्ये झाली, तिथेच गर्लफ्रेंडला घेऊन गेलो होतो. गर्लफ्रेंडला घेऊन रेस्टॉरंटला जाण्यामागे आई-वडिलांची भेट जिथे झाली ते ठिकाण पाहण्याची होती इच्छा 'प्रेमात पडायचं असेल तर व्हर्सिटी रेस्टॉरंटमध्ये जा; मात्र तिथे चिकन चासर कधीही खाऊ नका,' असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
सोहळा संपल्यानंतर राहुल गांधी यांना तुमची गर्लफ्रेंड आता कुठेय? असा सवाल केल्यानंतर राहुल गांधी यांनी हसत हसत उत्तर दिलं आहे की, 'ती आता माझी चांगली मैत्रिण आहे.' हा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. तसंच, अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.
सोनिया गांधी यांनी आत्मचरित्र लिहिण्यामागचं कारणही सांगितलं आहे. या पुस्तकातून स्वतःबद्दल आणि आपल्या कुटुंबाबद्दल पसरवण्यात आलेल्या चुकीच्या कथनांना सत्याच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याचे सोनिया गांधी यांनी सांगितले. तसंच, पती राजीव गांधी, सासू आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी तसेच मुलगा राहुल आणि मुलगी प्रियंका यांच्याबाबत अनेक चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. त्यामुळे आपल्या कुटुंबाचे खरे आयुष्य लोकांसमोर मांडण्यासाठी आत्मचरित्र लिहिण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘राजीव यांच्या हत्येनंतर मुलांनीच मला सावरले’
राजीव गांधी यांच्या हत्येच्या धक्कादायक घटनेची आठवण सांगताना सोनिया गांधी भावूक झाल्या. त्या कठीण काळात राहुल आणि प्रियंका यांनीच आपल्याला मानसिक आधार दिला, असे त्यांनी सांगितले. ‘माझा मुलगा आणि मुलगी दोघेही माझ्या मदतीला धावून आले. मी त्यांचे मूल झाले आणि ते माझे आई-वडील झाले,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.