• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /शरद पवार यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्ष का स्थापन केला? 1999 मधील भारतातील सर्वात मोठ्या राजकीय संघर्षाचा खळबजनक गौप्यस्फोट

शरद पवार यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्ष का स्थापन केला? 1999 मधील भारतातील सर्वात मोठ्या राजकीय संघर्षाचा खळबजनक गौप्यस्फोट

सोनिया गांधी आत्मचरित्र : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह'  हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. शरद पवार यांना काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्ष का स्थापन करावा लागला?  भारतातील सर्वात मोठ्या राजकीय घडामोडीचा सोनिया गांधींच्या पुस्तकात खुलासा करण्यात आला आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 11, 2026, 19:21 IST|Updated: Nov 11, 2026, 19:24 IST
joinshare
शरद पवार यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्ष का स्थापन केला? 1999 मधील भारतातील सर्वात मोठ्या राजकीय संघर्षाचा खळबजनक गौप्यस्फोट

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

सोनिया गांधी आत्मचरित्र : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह'  हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. शरद पवार यांना काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्ष का स्थापन करावा लागला?  भारतातील सर्वात मोठ्या राजकीय घडामोडीचा सोनिया गांधींच्या पुस्तकात खुलासा करण्यात आला आहे.  

सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रात राष्ट्रवादीच्याय स्थापनेपूर्वीचा उल्लेख करण्यात आलाय. 1999 मधील काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाचा मोठा गौप्यस्फोट करण्यात आलाय. शरद पवारांनी सोनिया गांधींच्या परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी काँग्रेसच्या तत्कालीन कार्यकारिणीतील तीन नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलं होतं. या पत्रात परदेशात जन्म झाल्यामुळे त्यांना भारतात सर्वोच्च पद भूषवता येणार नाही, अशी भूमिका मांडण्यात आली होती.  त्यानंतर सोनिया गांधींनी राजीनामा दिला होता. मात्र त्यांच्या राजीनाम्यात पत्रात त्यांनी परदेशी जन्म झाला असला तरी भारत माझी मातृभूमी असून अखेरच्या श्वासापर्यंत मी भारतीयच राहीन, असं लिहिलं होतं.

दरम्यान कार्यकर्त्यांच्या दबाव आणि काँग्रेस कार्यकारिणीच्या आग्रहानंतर सोनिया गांधींनी राजीनामा मागे घेतला. त्यानंतर शरद पवारांसह तिन्ही नेत्यांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. 

सोनिया गांधींनी या पुस्तकात आणीबाणीवरही दावे केले आहेत. आणीबाणी लावण्यावरून इंदिरा गांधींवर नेहमीच टीका होते. मात्र या पुस्तकातून सोनियांनी इंदिरा गांधींची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे. आणीबाणी लागू करण्याचा इंदिरा गांधींचा विचार नव्हता असा दावा सोनिया गांधींनी बिलॉग्निंग ए जर्नी ऑफ लव्ह या पुस्तकातून केला. आणीबाणी लागू करण्याबाबत त्यांच्या मनात संभ्रम होता. राजीव गांधीही आणीबाणीच्या विरोधात होते. मात्र संजय गांधी हे आणीबाणी लावण्याच्या समर्थनात होते असं त्यांनी म्हटलंय. 

सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राचं राष्ट्रवादी SPचे आमदार रोहित पवार यांनी कौतुक केले आहे. सोनिया गांधींचा प्रवास प्रेरणादायी असल्याचं रोहित पवारांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवारांची काँग्रेसशी जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर या पोस्टला विशेष महत्त्व आहे.

अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत यांनी सोनिया गांधींबाबत एक पोस्ट लिहून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. एका परदेशी स्त्रीच्या येण्याने कुटुंबात झालेले अनेक मृत्यू हा विलक्षण योगायोग असल्याचं कंगना रनौत यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय. त्यांच्या या पोस्टमुळे चर्चेला उधाण आलंय. या पुस्तकात सोनिया गांधींनी त्यांच्या व्यक्तिगत आणि राजकीय आयुष्यातील प्रसंग शब्दबद्ध केले आहेत. दरम्यान  कंगना रनौत यांच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण आले आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra Politics
Indian Politics
Political News