• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /जगभरातील दर 9 प्रोढांपैकी एकाला मधुमेह; गोवा, केरळमध्ये सर्वाधिक धोका; महाराष्ट्रातील स्थिती काय?

जगभरातील दर 9 प्रोढांपैकी एकाला मधुमेह; गोवा, केरळमध्ये सर्वाधिक धोका; महाराष्ट्रातील स्थिती काय?

आयडीएफ (IDF) मधुमेह ॲटलास 2025 नुसार भारतात मधुमेहग्रस्तांची संख्या 2050 पर्यंत 15.67 कोटी होऊ शकते. चीन, भारतासह सर्वाधिक मधुमेहग्रस्त असलेल्या देशांची यादी जाणून घ्या.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 13, 2026, 19:28 IST|Updated: Nov 13, 2026, 19:35 IST
joinshare
जगभरातील दर 9 प्रोढांपैकी एकाला मधुमेह; गोवा, केरळमध्ये सर्वाधिक धोका; महाराष्ट्रातील स्थिती काय?
Image Credit: मधुमेह

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या म्हणजेच आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघ - आयडीएफ (IDF) च्या 11व्या मधुमेह एटलस अहवाल समोर आलाय. यातून आलेली माहिती भारतीयांचं टेन्शन वाढवणारी आहे. यामुळे तुमच्या गोड खाण्यावर ब्रेकदेखील लागू शकतो. 2024 मध्ये भारतात 20 ते 79 वयोगटातील अंदाजे 8.98 कोटी प्रौढांना मधुमेह होता. या संख्येसह भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनमध्ये सर्वाधिक 14.8 कोटी मधुमेहग्रस्त प्रौढ असल्याचा अंदाज आहे. भारतातील परिस्थिती अधिक चिंताजनक बनण्याची शक्यता व्यक्त करत अहवालाने 2050 पर्यंत देशातील मधुमेहग्रस्तांची संख्या 15.67 कोटींवर पोहोचण्याचा अंदाज वर्तवलाय. अहवालातून नेमकं काय समोर आलंय? याचा भारतीयांवर कसा होणार परिणाम? सविस्तर जाणून घ्या.

2050 मध्ये सर्वाधिक रुग्ण असलेले टॉप 10 देश

अहवालातील 2050 च्या अंदाजानुसार मधुमेहग्रस्त प्रौढांच्या संख्येत चीन पहिल्या क्रमांकावर, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे.

- चीन – 16.83 कोटी
- भारत – 15.76 कोटी
- पाकिस्तान – 7.2 कोटी
- अमेरिका – 4.30 कोटी
- इंडोनेशिया – 2.86 कोटी
- इजिप्त – 2.47 कोटी
- ब्राझील – 2.40 कोटी
- बांगलादेश – 2.31 कोटी
- मेक्सिको – 1.99 कोटी
- तुर्की – 1.41 कोटी

या आकडेवारीवरून दक्षिण आशियातील देशांसमोर मधुमेहाचे आव्हान वाढत असल्याचे दिसून

भारतातील रुग्णांसमोर काय आव्हान?

या अहवालातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निदान न झालेला मधुमेह. भारतातील मधुमेहग्रस्त प्रौढांपैकी सुमारे 43 टक्के लोकांना आपल्याला मधुमेह असल्याची माहिती नसल्याचा IDF चा अंदाज आहे. म्हणजेच जवळपास 3.86 कोटी लोक निदानापासून वंचित असू शकतात. वेळेवर निदान न झाल्यास डोळे, मूत्रपिंड, हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित गुंतागुंत वाढू शकते.

जगभरातही रुग्णसंख्या वाढण्याचा अंदाज

2024 मध्ये जगभरात 58.87 कोटी प्रौढांना मधुमेह असल्याचा अंदाज आहे. 2050 पर्यंत ही संख्या 85.25 कोटींवर पोहोचू शकते. म्हणजेच भविष्यात जगातील जवळपास प्रत्येक आठ प्रौढांपैकी एकाला मधुमेह असण्याची शक्यता आहे. वाढते शहरीकरण, बदलती जीवनशैली आणि लोकसंख्येतील बदल हे या आरोग्यविषयक आव्हानाला कारणीभूत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

महाराष्ट्रातील नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?

मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये धावपळीचे जीवन, बैठी कामे आणि व्यायामासाठी कमी वेळ मिळणे यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. मात्र, केवळ जीवनशैलीवरून मधुमेहाचे निदान करता येत नाही. नियमित आरोग्य तपासणी, डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्तातील साखरेची चाचणी, संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचाल आणि पुरेशी झोप याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असल्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. विशेषतः तुमच्या कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करावी. हा आजार होण्याची वाट पाहण्यापेक्षा वेळेवर प्रतिबंधात्मक पावले उचलणे अधिक महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Health News
india
Maharashtra News