SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पुढील 12 दिवसात देशात काहीतरी मोठं होणार? 1 डिसेंबरपर्यंत... खासदारांना आलेल्या पत्रामुळे चर्चांना उधाण

देशाच्या राजकारणामध्ये काहीतरी मोठं घडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. नेमकं हे सारं प्रकरण आहे तरी काय? ही चर्चा का सुरु झाली आहे? जाणून घ्या सविस्तरपणे...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 18, 2026, 12:38 IST | Updated: Nov 18, 2026, 13:09 IST
Image Credit: नक्की आहे काय या पत्रामध्ये? (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य - रॉयटर्सवरुन साभार)
Join

भारताच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये पुढील 12 दिवसांमध्ये म्हणजेच 1 डिसेंबरपर्यंत काहीतरी मोठं घडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या चर्चेमागील कारण ठरत आहे एक पत्र! हे पत्र नक्की कोणी कोणाला पाठवलं आहे? या पत्रात आहे काय? जाणून घेऊयात...

काय आहे पत्रामध्ये?

सदर पत्र काँग्रेसच्या खासदारांना पाठवण्यात आलं असून पक्षाच्या सर्वच खासदारांना पुढील 12 दिवस प्रवासाचे नियोजन फ्लेक्सिबल ठेवण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत. महत्त्वाच्या संघटनात्मक आणि संसदीय घडामोडींची शक्यता लक्षात घेता या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शॉर्ट नोटीसवर दिल्लीत उपस्थित राहण्याची तयारी ठेवा, असं खासदारांना सांगण्यात आलं आहे. पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ही तयारी केल्याची सूत्रांची माहिती आहे.

कोणी पाठवलं आहे हे पत्र?

लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी खासदारांना हे पत्र पाठवलं आहे. खासदारांनी त्यांचे वैयक्तिक कार्यक्रम किंवा मतदारसंघातील दौरे पूर्णपणे रद्द करावे असा थेट उल्लेक पत्रात नाही, मात्र गरज पडल्यास त्यात बदल करता यावा यासाठी वेळापत्रक फ्लेक्सिबल  ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.

नेमकं काय होऊ शकतं?

इंग्रजी वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेचे पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्ट 2026 रोजी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले होते. परंतु ते अद्याप औपचारिकरीत्या स्थगित करण्यात आलेले नाही. यामुळे सरकार नवीन समन्स न काढता अगदी शॉर्ट नोटीसवर संसदेचे कामकाज पुन्हा सुरू करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. असं झालं तर पक्षाच्या खासदारांना या कामकाजामध्ये सहभागी होता आलं पाहिजे असा पक्षाचा मानस आहे.

सरकारचा प्रयत्न काय?

दुसरीकडे सरकारकडून आगामी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलीमीटेशन आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक मांडली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आगामी संसदीय रणनीती आणि पक्षीय बैठकांसाठी खासदारांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. 

संसदेत कोणाचे किती खासदार?

सध्या संसदेमध्ये भारतीय जनता पार्टीचे 241 खासदार आहेत. त्या खालोखाल काँग्रेसचे सर्वाधिक खासदार असून काँग्रेस खासदारांची संख्या 98 इतकी आहे. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचे 37 खासदार असून तृणमूल काँग्रेसचे 28 खासदार आहेत. डीएमके म्हणजेच द्रविड मुन्नेत्र कळघमचे 22 खासदार संसदेत आहेत. टीडीपी म्हणजेच तेलगू देसम पार्टीचे 16 खासदार 2024 मध्ये निवडून आले आहेत.

शिंदेंच्या शिवसेनेचे एकूण 13 खासदार असून नितेश कुमार यांच्या जनता दल युनायटेड अर्थात जेडीयूचे 12 खासदार आहेत. शरद पवारांच्या पक्षाचे 8, रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचे 5, ठाकरेंच्या शिवसेनेचे तीन आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक खासदार संसदेत आहे. राष्ट्रीय जनता दलाचे चार, व्हायएसआर काँग्रेसचे चार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे 4, आम आदमी पार्टीचे 3, झारखंड मुक्ती मोर्चाचे 3 खासदार संसदेत आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES