रविवार 15 नोव्हेंबर रोजी किती आहे LPG गॅस सिलेंडरचे रेट्स? जाणून घ्या आजच्या घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती
LPG Gas Cylinder Prices Today : LPG गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये झालेल्या चढ उतारांचा परिणाम हा सर्वसामान्यांच्या बजेटवर होत असतो. तेव्हा रविवारी 15 नोव्हेंबर रोजी घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतींमध्ये काही बदल झालाय का? याविषयी जाणून घेऊयात.
LPG Gas Cylinder Prices Today : सरकारी तेल मार्केटिंग कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला LPG गॅस सिलेंडरच्या किंमती अपडेट करत असतात. ही समीक्षा जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किंमती, प्रोपेन आणि ब्युटेनच्या आंतरराष्ट्रीय किंमती, तसेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचा विनिमय दर यांसारख्या घटकांवर अवलंबून असतात. मागील काही महिन्यात सर्वसामान्यांना दिलासा देत सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरचे दर बदलले नाहीत. मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये बदल केले गेले होते. LPG गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये झालेल्या चढ उतारांचा परिणाम हा सर्वसामान्यांच्या बजेटवर होत असतो. तेव्हा तुमच्या शहरातील LPG गॅस सिलेंडरच्या किंमतींविषयी जाणून घेऊयात.
तुमच्या शहरातील आजच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती :
दिल्ली 939.50 रुपये
नोएडा 939.50 रुपये
मुंबई 941.50 रुपये
कोलकाता 968.00 रुपये
पटना 1,031.50 रुपये
बेंगलुरु 944.50 रुपये
जयपुर 945.50 रुपये
तिरुवनंतपुरम 951.00 रुपये
लखनऊ 979.50 रुपये
हेही वाचा : फायनलमधील विजयानंतर भारतीय खेळाडूंचं भन्नाट सेलिब्रेशन, पाहून पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या
तुमच्या शहरातील आजच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती :
दिल्ली 2,820.00 रुपये
नोएडा 2,757.50 रुपये
मुंबई 2,774.50 रुपये
कोलकाता 2,964.00 रुपये
पटना 3,110.50 रुपये
बेंगलुरु 2,774.00 रुपये
जयपुर 2,839.00 रुपये
तिरुवनंतपुरम 2,861.50 रुपये
लखनऊ 2,932.50 रुपये
मुंबई आणि दिल्लीत LPG रेट्स कमी का?
मुंबई आणि दिल्ली येथे इतर शहरांच्या तुलनेत LPG गॅस सिलेंडरचे रेट्स कमी आहेत. मुंबईकडे आपला स्वतःच पोर्ट आहे. जिथे BPCL आणि HPCL ऑईल रिफायनरी सुद्धा आहेत. परदेशातून आयात केलेला गॅस सर्वप्रथम मुंबई बंदरात उतरवला जातो आणि तिथून तो बॉटलिंग प्लांटमध्ये पाठवला जातो. त्याचप्रमाणे दिल्ली एनसीआर हे देशातील सर्वात मोठे पुरवठा केंद्र आहे, ज्याचा मथुरा आणि पानिपत येथील रिफायनरींशी थेट संपर्क आहे. गॅसचे वहन पाइपलाइनद्वारे केले जात असल्याने ज्यामुळे टँकरद्वारे होणाऱ्या वाहतुकीशी संबंधित खर्च कमी होतो. त्यामुळे या दोन प्रमुख शहरांमधील LPG सिलेंडरच्या किंमती या तुलनेने कमी राहतात.