• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /फायनलमधील विजयानंतर भारतीय खेळाडूंचं भन्नाट सेलिब्रेशन, पाहून पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या

फायनलमधील विजयानंतर भारतीय खेळाडूंचं भन्नाट सेलिब्रेशन, पाहून पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या

U19 Asia Cup 2026 Final : पुरुष अंडर 19 आशिया कप 2026 फायनल सामन्यात भारताच्या रोमांचक विजयानंतर मैदानात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. विजयानंतर भारतीय खेळाडू हे थेट पाकिस्तानच्या डगआउटजवळ जाऊन आक्रमकपणे सेलिब्रेशन करताना दिसले.

Reported Bypooja pawar
Published: Nov 15, 2026, 08:52 AM IST|Updated: Nov 15, 2026, 10:02 AM IST
joinshare
फायनलमधील विजयानंतर भारतीय खेळाडूंचं भन्नाट सेलिब्रेशन, पाहून पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या
Image Credit: फायनलमधील विजयानंतर भारतीय खेळाडूंचं भन्नाट सेलिब्रेशन, पाहून पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

U19 Asia Cup 2026 Final : एसीसी पुरुष अंडर 19 आशिया कप 2026 ही स्पर्धा ओमान येथे खेळवण्यात आली. यात शनिवारी फायनल सामना हा भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झाला. जेव्हा जेव्हा हे दोन पारंपरिक विरोधी देशांचे संघ क्रिकेटच्या मैदानावर समोरासमोर येतात तेव्हा संपूर्ण जगाचं लक्ष हे त्या सामन्याकडे लागलेलं असतं. शनिवारी झालेला पुरुष अंडर 19 आशिया कप फायनलमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या जबड्यातून विजय खेचून आणला आणि आशिया कपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. मात्र या रोमांचक विजयानंतर मैदानात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवर चौकार ठोकल्यावर भारतीय खेळाडू हे थेट पाकिस्तानच्या डगआउटजवळ जाऊन आक्रमकपणे सेलिब्रेशन करत होते. सध्या याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पुरुष अंडर 19 आशिया कप स्पर्धेत शनिवारी भारतीय संघाने पाकिस्तानला 1 विकेटने मात देऊन सामना जिंकला. पाकिस्तानने विजयासाठी 338 धावांचं मोठं लक्ष दिलं होतं. भारतीय संघाने सामन्याच्या अगदी शेवटच्या बॉलवर विजय मिळवला, तोपर्यंत त्यांचे 9 विकेट बाद झाले होते. मात्र या संस्मरणीय विजयानंतर लगेचच मैदानावर मोठा तणाव निर्माण झाला. शेवटच्या बॉलवर चौकार मारल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी संघ आणि त्यांच्या खेळाडूंसमोर अत्यंत आक्रमक आणि उत्साही पद्धतीने जल्लोष केला, ज्यामुळे काही काळासाठी मैदानातील वातावरण तणावपूर्ण बनले.

मैदानावर भारतीय खेळाडूंच्या या आक्रमक सेलिब्रशनची तीव्रता पाहून दोन्ही संघातील तणाव वाढत होता. त्यानंतर स्थिती सांभाळण्यासाठी सपोर्ट स्टाफला मध्ये यावं लागलं. सपोर्ट स्टाफने पुढे येऊन खेळाडूंना शांत केलं आणि प्रकरण अधिक चिघळण्यापासून थांबावलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कनिष्ठ व वरिष्ठ स्तरावरील अलीकडील सामन्यांमध्ये दिसून आलेल्या प्रमाणेच या अंतिम सामन्यानंतरही दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन  केले नाही.

हेही वाचा : शेवटच्या ओव्हरचा रोमांच, पाकिस्तानच्या जबड्यातून कसा खेचून आणला विजय? जाणून घ्या 'त्या' ओव्हरमध्ये काय काय घडलं?
 

 THE WINNING MOMENT FOR INDIA.  - A historic victory for India over Pakistan.  https://t.co/3gnrk6zBhb

Mufaddal Vohra (mufaddal_vohra) November 14, 2026

 पाकिस्तानची प्लेईंग 11: उस्मान खान, हायम खान, अब्दुल कादिर, फरहान युसुफ (कर्णधार), अहमद हुसेन, अली रझा, हमजा जहूर (विकेटकिपर), हसनैन अब्बास दार, मोहम्मद सय्यम, रिझवानुल्ला, निकाब शफीक 

भारताची प्लेईंग 11 : लक्ष्य राजेश रायचंदानी (कर्णधार), आर्यवीर सेहवाग, व्हीके विनीत, यशवर्धन चौहान, अर्जुन राजपूत, अन्वय द्रविड (विकेटकिपर), मनाल चौहान, मोहित उलवा, आर्यन सवसानी, काव्या पटेल, चिगुरुपती व्यंकट

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Cricket News
Team india