Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाचे भाव आता पुन्हा एकदा 110 डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास पोहोचला आहे. आजच्या दिवसात कच्च्या तेलाचा भाव हा 3.51 टक्क्यांनी वाढून 101.41 डॉलर बॅरल एवढा झाला आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत होणारी वाढ ही जागतिक चिंतेची बाब आहे. जर किंमती आणखी वाढल्या, तर तेल कंपन्यांसमोर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. मात्र दिलासादायक बाब ही आहे की कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होऊनही भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. तेव्हा तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव किती आहेत याविषयी जाणून घेऊयात.
देशातील प्रमुख शहरात किती आहे पेट्रोल- डिझेलचा भाव?
18 ऑक्टोबर रोजी मुंबईत डिझेलच्या किंमती या 97.83 रुपये प्रतिलिटर आहेत. तर डिझेल हे प्रति लिटर 111.21 रुपये इतकं आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आज 102.12 रुपये तर डिझेल 95.20 रुपये प्रति लिटर आहेत. प्रीमियम XP95 109.24 रुपये आणि हाई-ऑक्टेन XP100 167.35 रुपये आहे. तर देशातील आणखीन एक प्रमुख शहरांपैकी एक असणाऱ्या फरीदाबादमध्ये आज पेट्रोल 103.28 रुपये आणि डिझेल 95.94 रुपये प्रति लीटर आहे. गुरुग्राममध्ये आज पेट्रोल प्रति लिटर 102.97 रुपयांना आणि डिझेल 95.64 रुपयांना उपलब्ध आहे. नोएडामध्ये पेट्रोल 102.12 आणि डिझेल 95.56 XP95 110.68 लिटर आहे. तर XG 101.17 रुपये प्रति लिटर मिळेल.
चंदीगडमध्ये आज पेट्रोलची किंमत 101.51 प्रति लिटर आहे. चंदीगडमध्ये आज डिझेल 89.47 प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. XP95 110.28 आणि XG 94.65 प्रति लीटरला मिळत आहे. उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर 100.55 रुपये आणि डिझेलची किंमत प्रति लिटर 95.93 रुपये इतकी आहे. हिमाचल प्रदेशमधील सिमलामध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर 103.25 रुपये, डिझेलची किंमत प्रति लिटर 95.21 रुपये आणि प्रीमियम 'एक्सपी95' (XP95) पेट्रोलची किंमत प्रति लिटर 111.90 रुपये इतकी आहे.
मध्यप्रदेशची राजधानी भोपालमध्ये पेट्रोल 114.57 रुपये , डिझेल 99.64 रुपये प्रति लिटर इतकं आहे. तर XP95 123.88 आणि 104.90 प्रति लीटर आहे. बिहारमधील पाटण्यात पेट्रोलची किंमत 113.37 रुपये आणि डिझेलची किंमत 99.36 रुपये आहे. राजस्थानमधील जयपूरमध्ये पेट्रोल 112.69 रुपये आणि डिझेल 97.78 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. झारखंडमधील रांचीमध्ये पेट्रोलची किंमत 105.26 रुपये आणि डिझेलची किंमत 100.49 रुपये आहे, तर उत्तर प्रदेशमधील लखनऊमध्ये पेट्रोल 101.89 रुपये आणि डिझेल 95.36 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.