Petrol Diesel Rates Today : अमेरिका आणि ईराण युद्धाच्या कारणामुळे 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' बंद झालं आहे. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. मात्र भारतात त्यामानाने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या स्थिर आहेत. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याचे श्रेय केंद्र सरकारच्या धोरणाला दिले, ज्यामध्ये उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) कपात करणे आणि देशांतर्गत इंधनाचा पुरवठा अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करणे यांचा समावेश होता. सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे आजचे ताजे दर जाहीर केले. तेव्हा तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवे रेट्स काय आहेत याविषयी जाणून घेऊयात.
अलीकडील कपातीनुसार पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनांवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात प्रति लिटर 10 रुपयांची कपात करण्यात आली आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती सध्या प्रति बॅरल 92 डॉलर्सच्या आसपास आहेत. नुकत्याच केलेल्या कपातीनुसार, पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात प्रति लिटर 10 रुपयांची कपात करण्यात आली आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती सध्या प्रति बॅरल 92 डॉलर्सच्या आसपास आहेत, तर संकट सुरू होण्यापूर्वी त्या प्रति बॅरल सुमारे 67 ते 68 डॉलर्स इतक्या होत्या.
तुमच्या शहरातील पेट्रोलच्या प्रतिलिटर किंमती (रुपये) :
दिल्ली 102.12 रुपये
मुंबई 111.21 रुपये
कोलकाता 113.51 रुपये
चेन्नई 107.76 रुपये
बंगळुरू 111.68 रुपये
हैदराबाद 116.15 रुपये
गुरुग्राम 102.97 रुपये
लखनऊ 101.89 रुपये
पटना 113.35 रुपये
जयपुर 113.19 रुपये
नोएडा 101.96 रुपये
अहमदाबाद 102.15 रुपये
तुमच्या शहरातील डिझेलच्या प्रतिलिटर किंमती (रुपये) :
दिल्ली 95.20 रुपये
मुंबई 97.83 रुपये
कोलकाता 99.82 रुपये
चेन्नई 99.55 रुपये
बंगळुरू 99.56 रुपये
हैदराबाद 104.23 रुपये
गुरुग्राम 95.64 रुपये
लखनऊ 95.36 रुपये
पटना 99.36 रुपये
जयपुर 98.25
नोएडा 95.44
अहमदाबाद 98.27