Petrol Diesel and CNG RatesToday : आंतरराष्ट्रीय पाळतीवर कच्च तेल महागल्याने सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांवर आता दबाव वाढत चालला आहे. मात्र यात चांगली गोष्ट अशी की 26 ऑक्टोबर रोजी सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल झालेला नाही. आज भारताच्या प्रमुख शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या भावात बदल झालेले नाहीत. मात्र मुंबई, चेन्नई, बंगळुरू सहित अनेक ठिकाणांवरील CNG च्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. तेव्हा तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तसेच CNG च्या किंमती जाणून घेऊयात.
26 ऑक्टोबर रोजी तुमच्या शहरातील पेट्रोलच्या किंमती :
मुंबई : 111.21 रुपये प्रति लीटर
दिल्ली : 102.12 रुपये प्रति लीटर
नोएडा: 102.12 रुपये प्रति लीटर
कोलकता :113.51 रुपये प्रति लीटर
गुरुग्राम: 102.97 रुपये प्रति लीटर
भोपाल: 114.57 रुपये प्रति लीटर
पटना: 113.37 रुपये प्रति लीटर
बेंगलुरु: 110.93 रुपये प्रति लीटर
भुवनेश्वर: 109.92 रुपये प्रति लीटर
चंडीगढ़: 98.10 रुपये प्रति लीटर
हैदराबाद: 115.69 रुपये प्रति लीटर
26 ऑक्टोबर रोजी तुमच्या शहरातील डिझेलच्या किंमती :
मुंबई : 97.83 रुपये प्रति लीटर
दिल्ली : 95.20 रुपये प्रति लीटर
नोएडा: 95.56 रुपये प्रति लीटर
कोलकाता : 99.82 रुपये प्रति लीटर
गुरुग्राम: 95.64 रुपये प्रति लीटर
भोपाल: 99.64 रुपये प्रति लीटर
पटना: 99.36 रुपये प्रति लीटर
बेंगलुरु: 98.80 रुपये प्रति लीटर
भुवनेश्वर: 100.92 रुपये प्रति लीटर
चंडीगढ़: 86.09 रुपये प्रति लीटर
हैदराबाद: 103.82 रुपये प्रति लीटर
CNG च्या किंमतीत वाढ :
मुंबईत CNG च्या किंमतीत 1 रुपयाची वाढ होऊन ती 89.00 रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये CNG च्या किंमतीत 2 रुपयांची वाढ होऊन ती 99.50 रुपये झाली आहे. बंगळुरूमध्ये CNG च्या किंमतीत 1 रुपयाची वाढ होऊन ती 98.00 रुपये झाली आहे. सोनीपतमध्येही 1 रुपयाची वाढ झाली असून, तिथे सीएनजीची किंमत 95.00 रुपये झाली आहे.
मथुरेमध्ये CNG च्या किमतीत 2 रुपयांची वाढ होऊन ती 102.00 रुपयांवर पोहोचली आहे. नवी दिल्ली आणि एनसीआरमध्ये CNG ची किंमत 86.98 रुपये इतकी स्थिर आहे. रेवाडीमध्ये CNG ची किंमत 91.59 रुपये आहे, तर हैदराबादमध्ये ती 112.00 रुपये आहे. प्रमुख शहरांपैकी हैदराबादमध्ये CNG ची किंमत सर्वाधिक आहे तर नवी दिल्ली आणि एनसीआरमध्ये ती सर्वात कमी आहे.