SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

12 रुपयाचं प्युअर सोनं, 15 रुपयाची चांदी…, खरेदीसाठी ग्राहकांची उडाली झुंबड; काय आहे नेमकं प्रकरण?

12 रुपयाचं प्युअर सोनं, 15 रुपयाची चांदी मिळत आहे, अशा बातम्या येत आहे. त्यामुळे लोकांना कळत नाहीय नेमकं हे आहे तरी काय? हे कसं शक्य आहे, गुंतवणूकदार इतक्या स्वस्तात कसं खरेदी करत आहे, या आहे यामागील सत्य जाणून घ्या.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 20, 2026, 22:24 IST | Updated: Nov 20, 2026, 22:28 IST
Image Credit: Pure gold silver
Join

गेल्या वर्षभरात आपण सोनं - चांदीच्या दरात मोठी चढ पाहिला मिळाली. सोनं - चांदीच्या दरात रोज कमी जास्त दर होता आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून लग्नसराईच्या दिवसांमध्ये सोन्या - चांदीत मोठी घसरण पाहिला मिळतेय. अशातच 12 रुपयाचं प्युअर सोनं, 15 रुपयाची चांदी मिळत आहे आणि ग्राहक मोठ्या प्रमाणात ते खरेदी करत आहेत. एवढा कमी किंमतीत सोनं आणि चांदी कुठे मिळत आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. तर मग जाणून घेऊयात यामागील सत्य.

सोनं आणि चांदी हे आपल्याला दोन प्रकारे खरेदी करता येतं. एक म्हणजे फिजिकल आणि दुसरं आहे जे गेल्या काही वर्षांमध्ये अधिक प्रचित झालं ते म्हणजे डिजिटल. गेल्या काळात डिजिलट खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. जेव्हापासून सोनं - चांदीचे ईटीएम मार्केट आलंय तेव्हापासून ग्राहकांची सर्वाधिक पसंती आहे. एवढंच नाहीतर भारतीय किरकोळ गुंतवणूकदारांचा कलही सोनं आणि चांदी एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF)कडे  मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. एका अहवालानुसार एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) विक्रमी गुंतवणूक झाल्याचा आकडे समोर आले आहेत.


12 रुपयाचं प्युअर सोनं, 15 रुपयाची चांदी कुठे मिळतंय?

तुम्हाला जर 12 रुपयाचं प्युअर सोनं हवं असेल तर टाटा गोल्ड ईटीएफ, ग्रो गोल्ड ईटीएफ, एंजल वन गोल्ड ईटीएफ आणि डीएसपी गोल्ड ईटीएफ इथे उपलब्ध आहे. तर हेही जाणून घ्या की, सोन्याचा फिजिकल बाजारभाव प्रति 10 ग्रॅम सुमारे ₹1.25 लाख आहे. तर एक ग्रॅम सोने अंदाजे ₹13,000 रुपयांमध्ये मिळत आहे. मात्र, गुंतवणूकदार ईटीएफच्या माध्यमातून फक्त ₹12 मध्ये सोने खरेदी करण्यावर भर देत आहेत. जेव्हा सोनं चांदी लाखांच्या घरात मिळत असेल तेव्हा सोने आणि चांदी ₹12-₹15 ला मिळत असेल, तर गुंतवणूकदार साहजिकच याकडे आकर्षित होणार यात काही शंका नाही.

तर चांदीबद्दल बोलायचं झालं तर टाटा सिल्व्हर ईटीएफ, ग्रो सिल्व्हर ईटीएफ, कोटक सिल्व्हर ईटीएफ, डीएसपी सिल्व्हर ईटीएफ आणि क्वांट सिल्व्हर ईटीएफ हे प्रति युनिट सुमारे ₹15 रुपयात मिळत आहे. तर तुम्हाला चांदी अजून स्वस्त हवी असेल तर अँगल वन सिल्व्हर ईटीएफचे एक युनिट ₹5 मध्ये मिळत आहे.

हेसुद्धा वाचा - 2027 मध्ये सोन्याची किंमत किती असणार? बाबा वेंगाच्या धक्कादायक भविष्यवाणीने डोकं गरगरेल

सोनं - चांदी डिजिटवर एवढं स्वस्त कसं?


आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, सोनं - चांदीचे दर लाखांच्या घरात असताना  12 ते 15 रुपयात सोनं - चांदी कशी मिळत आहे. तर हे गणित समजून घ्या, तज्ज्ञ सांगतात की, 12 रुपयाचा ETF, 100 रुपयाच्या ETF पेक्षा स्वस्त असतो. उदाहरणाद्वारे समजून घ्या बघा जर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,21,000 रुपये प्रति आहे तर त्या 0.001 ग्रॅम सोन्याचं मूल्य सुमारे 12 रुपये होतं. कोणत्याही ईटीएफची प्रति यूनिट किमत (NAV) यावर अवलंबून आहे. फंड हाऊसमध्ये एक यूनिट सोने वा चांदीची किती मात्रा (जसं की, 0.01 ग्रॅम वा 0.1 ग्रॅम) ने पाहिली जाते. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES