• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /पुण्याच्या सिंहगड संस्थेला मुंबई हायकोर्टाचा दणका, महाविद्यालयांवर प्रशासकाची नियुक्ती!

पुण्याच्या सिंहगड संस्थेला मुंबई हायकोर्टाचा दणका, महाविद्यालयांवर प्रशासकाची नियुक्ती!

पुण्याच्या सिंहगड संस्थेला मुंबई हायकोर्टने दणका दिलाय. संस्थेच्या 7 महाविद्यालयांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलीय.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 12, 2026, 22:19 IST|Updated: Nov 12, 2026, 22:53 IST
joinshare
पुण्याच्या सिंहगड संस्थेला मुंबई हायकोर्टाचा दणका, महाविद्यालयांवर प्रशासकाची नियुक्ती!
Image Credit: सिंहगड संस्था

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिलाय. न्यायालयाच्या आदेशांचे वारंवार उल्लंघन केल्याने सात महाविद्यालयांवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहेत. सात कायम विनाअनुदानित महाविद्यालयांचे व्यवस्थापन तीन वर्षांसाठी शासनाच्या ताब्यात असणार आहेत. 
प्रभारी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

काय आहे प्रकरण?

शिक्षकांचे वेतन थकवणे, निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी न देणे आणि संस्थेच्या निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याने पुण्यातील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी म्हणजेच एसटीईएस अडचणीत आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने संस्थेशी संबंधित 44 शैक्षणिक संस्थांच्या आर्थिक व्यवहारांची सीबीआय, ईडी आणि प्राप्तिकर विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

13 शिक्षकांच्या आत्महत्यांचा उल्लेख

या प्रकरणात सुमारे 13 शिक्षकांनी आत्महत्या केल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. या प्रत्येक घटनेचे स्वतंत्र कारण मागविण्यात आले आहे. संस्थेतील तांत्रिक शिक्षण संस्थांचा ताबा प्रशासकाकडे देण्याचे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. शिक्षण विभागाला काही संस्थांचा ताबा घेण्याचे किंवा विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये सामावून घेण्याचे पर्याय तपासण्यास सांगितले आहे.


आठ वर्षांपासून वेतन थकल्याचा आरोप

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीअंतर्गत पुणे आणि परिसरात विविध शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक शिक्षण संस्था चालवल्या जातात. या संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तिवेतन आणि इतर सेवा लाभ दीर्घकाळापासून थकले असल्याच्या तक्रारी न्यायालयात दाखल झाल्या होत्या. काही संस्थांमध्ये जवळपास आठ वर्षांपासून वेतन देण्यात आलेले नाही. कर्मचाऱ्यांची एकूण थकबाकी ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे न्यायालयीन आदेशात नमूद आहे. न्यायालयाने यासंदर्भात निरीक्षण नोंदविले आहे.

सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग तपास करणार

संस्थेच्या निधीचा वापर इतर व्यवसायांसाठी झाला आहे का?, आर्थिक व्यवहारांत गैरव्यवहार झाला आहे का? आणि मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे का?, याची चौकशी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. सीबीआय संस्थेच्या कारभारातील आर्थिक अनियमितता तपासणार आहे. ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगच्या शक्यतेची चौकशी करणार असून प्राप्तिकर विभाग संस्था आणि विश्वस्तांनी दाखल केलेल्या आयकर विवरणपत्रांची तपासणी करणार आहे.

 

प्रशासक नियुक्त केलेली सात महाविद्यालये :

सिंहगड विधी महाविद्यालय – आंबेगाव

श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ एज्युकेशन – कुसगाव, लोणावळा

सिंहगड कला आणि वाणिज्य महाविद्यालय – नऱ्हे

निवृत्ती बाबाजी नवले वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय – कुसगाव, लोणावळा

सिंहगड वाणिज्य महाविद्यालय – कोंढवा

श्रीमती काशीबाई नवले वाणिज्य महाविद्यालय – एरंडवणे

सिंहगड विज्ञान महाविद्यालय – आंबेगाव बुद्रूक

Add Zee News as a Preferred Source

Related News

पुण्यातील सिंहगड संस्था CBI-ED च्या रडारवर! 13 शिक्षकांनी संपवलं आयुष्य अन् 400 कोटींची थकबाकी; काय घडलंय नेमकं?

TAGS:
india
High court