• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /'माझा जन्म परदेशात झाल्याने शरद पवारांनी...', सोनिया गांधींचा गौप्यस्फोट; मोदींबद्दलही मोठा दावा, 'त्यांना पंतप्रधान करण्यासाठी RSS ने...'

'माझा जन्म परदेशात झाल्याने शरद पवारांनी...', सोनिया गांधींचा गौप्यस्फोट; मोदींबद्दलही मोठा दावा, 'त्यांना पंतप्रधान करण्यासाठी RSS ने...'

सोनिया गांधी यांचे बहुचर्चित आत्मचरित्र 'बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह' आज प्रकाशित होत असून या पुस्तकातील काही मजकूर समोर आला आहे. यापैकी एका ठिकाणी शरद पवारांचा तर अन्य एका ठिकाणी मोदी पंतप्रधान होण्यासंदर्भातील उल्लेख आहे.

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 10, 2026, 13:10 IST|Updated: Nov 10, 2026, 13:26 IST
joinshare
'माझा जन्म परदेशात झाल्याने शरद पवारांनी...', सोनिया गांधींचा गौप्यस्फोट; मोदींबद्दलही मोठा दावा, 'त्यांना पंतप्रधान करण्यासाठी RSS ने...'
Image Credit: दोन बड्या नेत्यांबद्दल दोन मोठे दावे (फोटो सोशल मीडिया आणि वृत्तसंस्थांकडून साभार)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे बहुचर्चित आत्मचरित्र 'बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह' आज प्रकाशित होत आहे. या पुस्तकामधून सोनिया गांधींनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. पुस्तकामध्ये एके ठिकाणी सोनिया गांधींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या कहाणीसंदर्भात खुलासा केला आहे. 1999 मधील काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षासंदर्भातील हा खुलासा असून यामध्ये राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी कशाप्रकारे सोनिया गांधींना परदेशात जन्मल्याने विरोध केलेला याबद्दल सांगितलं आहे.

तीन मुख्य नेत्यांमध्ये शरद पवार

शरद पवारांनी सोनिया गांधींच्या परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित केल्याचं सोनिया गांधींच्या आत्मचरित्रात म्हटलं आहे. काँग्रेसच्या तत्कालीन कार्यकारिणीतील तीन नेत्यांनी मे 1999 मध्ये सोनिया गांधींना पत्र लिहिले होते. या पत्रात परदेशात जन्म झाल्यामुळे त्यांना भारतातील सर्वोच्च पद भूषवता येणार नाही, अशी भूमिका मांडण्यात आली होती. या तीन नेत्यांमध्ये शरद पवार प्रमुख होते, असा उल्लेख सोनिया गांधींनी आपल्या 'बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह'या पुस्तकात केला आहे.

राजीनामा आणि गोंधळ

या घटनेनंतर सोनिया गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली. देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली आणि राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. सोनिया गांधींनी राजीनाम्याच्या पत्रात, परदेशात जन्म झाला असला तरी भारत माझी मातृभूमी आहे आणि अखेरच्या श्वासापर्यंत मी भारतीयच राहीन, अशी भूमिका मांडली होती.

तीन नेत्यांवर कारवाई

कार्यकर्त्यांचा दबाव आणि काँग्रेस कार्यकारिणीच्या आग्रहानंतर सोनिया गांधींनी राजीनामा मागे घेतला. त्यानंतर काँग्रेसने विशेष अधिवेशनात शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर या तिन्ही नेत्यांवर कारवाई केली. पुढे शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, असा उल्लेख पुस्तकात आहे.

महाराष्ट्रात केली आघाडी

सोनिया गांधींनी पुढे महाराष्ट्रात राष्ट्रवादीसोबत काँग्रेसने आघाडी केल्याचंही सांगितलं. "महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आम्ही वेगवेगळ्या लढलो, मात्र नंतर आघाडी केली. त्यावेळी ती एखादी कडू गोळी गिळण्यासारखी गोष्ट होती, मात्र आम्ही आघाडी सरकार स्थापन करू शकलो आणि तेव्हापासून आमची आघाडी कायम आहे," असं सोनिया गांधींनी म्हटलं आहे.

अण्णा हजारेंचं आंदोलन भाजप- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पुरस्कृत

सोनिया गांधींनी आपल्या आत्मचरित्रामध्ये अण्णा हजारेंचं आंदोलन भाजप- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पुरस्कृत केलेलं होतं, असंही म्हटलं आहे. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी 'आरएसएस'ने 2012 पासूनच आखली होती रणनीती, असा दावा सोनिया गांधींनी आपल्यात पुस्तकात केला आहे.  अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला भाजप आणि 'आरएसएस'चा पाठिंबा असल्याचेही सोनिया गांधींनी म्हटलं आहे.

मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आरएसएसने...

आंदोलनासाठी भाजप-'आरएसएस'कडून नियोजन आणि संघटन केल्याचा उल्लेख पुस्तकात आहे. तसेच, अण्णा आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेस सरकारला घेरण्यात आल्याचे निरीक्षण सोनिया गांधींनी पुस्तकात नोंदवले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 'आरएसएस'ने नरेंद्र मोदींच्या राष्ट्रीय नेतृत्वासाठी बेस तयार केल्याचा दावा सोनिया गांधींनी केला आहे. मोदींच्या प्रचारासाठी हजारो तरुणांची सोशल मीडिया टीम कामाला लावल्याचा उल्लेखही पुस्तकात करण्यात आलाय. देशभर होर्डिंग्ज, सोशल मीडिया आणि होलोग्राम तंत्रज्ञानाद्वारे मोदींची प्रतिमा उभी केल्याचे पुस्तकात नमूद केलं आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sonia Gandhi
congress
PM Narendra Modi
Sharad Pawar