• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /दिवाळीला कंपनीने दिली 1 आठवड्यांची सुट्टी; कर्मचाऱ्यांना मिळाला मोठा ब्रेक, पण पुढच्या 24 तासात असं काही झालं की...

दिवाळीला कंपनीने दिली 1 आठवड्यांची सुट्टी; कर्मचाऱ्यांना मिळाला मोठा ब्रेक, पण पुढच्या 24 तासात असं काही झालं की...

एका स्टार्टअप कंपनीची लिव्ह पॉलिसी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. कंपनीने 'वर्क-लाइफ बॅलन्स'वर भर दिल्याबद्दल लोक या कंपनीचे कौतुक होत आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 08, 2026, 13:38 IST|Updated: Nov 08, 2026, 13:41 IST
joinshare
दिवाळीला कंपनीने दिली 1 आठवड्यांची सुट्टी; कर्मचाऱ्यांना मिळाला मोठा ब्रेक, पण पुढच्या 24 तासात असं काही झालं की...
Image Credit: दिवाळीला कंपनीने दिली 1 आठवड्यांची सुट्टी

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

सध्या कंपनीत काम करणारे अनेक कर्मचारी तेथील कामाच्या टॉक्सिक पद्धतीला कंटाळले आहेत. अशा कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकच चिंता सतावत असते ती म्हणजे काम आणि वैयक्तिक आयुष्यातील समतोल साधताना होणारी दमछाक. मात्र अशाही काही कंपन्या आहेत ज्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याचाही विचार करत 'वर्क-लाइफ बॅलन्स'ला (काम आणि वैयक्तिक आयुष्यातील समतोल) खऱ्या अर्थाने प्राधान्य देतात. अशीच एक कंपनी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. कंपनी इतकी चर्चेत आहे की, त्यांच्याकडे नोकरी करण्यासाठी रांग लागली आहे.

कंपनीकडून 7 दिवसांची सुटी

इंदूर मधील 'फीडबॉक्स' (FeedBox) या स्टार्टअप कंपनीने दिवाळीनिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना सलग 7 दिवसांची सुटी दिली आहे, आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि मित्र-मैत्रिणींसोबत पुरेसा वेळ घालवता यावा हा त्यामागील उद्देश आहे.

कंपनीला नोकरीसाठी 250 हून अधिक अर्ज

'फीडबॉक्स' ही एक डिजिटल मार्केटिंग एजन्सी आहे. कंपनीचे सह-संस्थापक यश कुलश्रेष्ठ यांनी लिंक्डइनवर दिवाळीच्या सुट्ट्यांबाबत एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट इतक्या वेगाने व्हायरल झाली की, अवघ्या 24 तासांत कंपनीला 250 हून अधिक नोकरीचे अर्ज प्राप्त झाले. विशेष म्हणजे, या अर्जदारांमध्ये केवळ इंटर्न्सच नाहीत, तर ऑपरेशन्स हेड आणि सीएक्सओ (CXO) स्तरावरील अनुभवी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

'फीडबॉक्स' (Feedbox) मधील दिवाळी सुट्टीचे वेळापत्रक असे आहे -

4 नोव्हेंबर – कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना मिठाई आणि दिवाळीच्या भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.

5 आणि 6 नोव्हेंबर – या दोन दिवसांसाठी 'वर्क-फ्रॉम-होम' सुविधा देण्यात आली होती. इंदूरबाहेरील कर्मचाऱ्यांसाठी हे विशेष फायदेशीर ठरले, कारण यामुळे त्यांना ट्रॅफिक आणि गर्दी टाळून वेळेवर घरी पोहोचणे शक्य झाले आणि त्याच वेळी त्यांनी घरून आपले कामही सुरू ठेवले.

7 नोव्हेंबरपासून – दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या (ज्यात अर्ध्या दिवसाची सुट्टीही समाविष्ट होती), ज्यामुळे कर्मचाऱ्यांना सण साजरा करण्याची आणि आपल्या कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळाली.

11 नोव्हेंबर – आठवडाभराच्या सुट्टीनंतर, सर्व कर्मचारी पुन्हा कार्यालयात परततील.

मग कामाचं काय?

विशेष म्हणजे कंपनीने सुट्ट्यांसाठी कठोर नियम केलेला नाही. जर एखाद्या कर्मचाऱ्याला आपल्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवायचा असेल, तर तो हवी असल्यास सुटी वाढवून घेऊ शकेल अशी व्यवस्था कंपनीने केली आहे.

यश कुलश्रेष्ठ यांच्या सांगण्यानुसार, त्यांच्या टीममधील जवळपास सर्व सदस्य इंदूरबाहेरचे आहेत. सण-उत्सवांच्या काळात लोक जी रजा घेतात, त्यातील मोठा वेळ केवळ घरी जाण्या-येण्याच्या प्रवासातच खर्च होतो. कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची पुरेशी संधी मिळावी, या उद्देशाने कंपनीने हे धोरण सुरू केले आहे.

2019 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी, अशा सुट्ट्यांबाबत आपल्या ग्राहकांना किमान तीन आठवडे आधी कल्पना देते, ज्यामुळे टीमला आपली कामे पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.

ही कंपनी, जी युनिकॉर्न कंपन्या, लिस्टेड ​​कंपन्या आणि गुंतवणूक मिळालेल्या स्टार्टअप्ससोबत काम करते. या काळात ते नवीन प्रोजेक्ट स्वीकारणे टाळते. हे केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी नसून कंपनी अनेक वर्षांपासून ही पद्धत पाळत आली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Viral News