काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र बिलॉन्गिंगः ए जर्नी ऑफ लव प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकातून त्यांनी काँग्रेस अध्यक्षा बनण्यापासूनच्या राजकीय घडामोडी आणि गांधी परिवारातील काही क्षणांचेही कथन केले आहे. सोनिया गांधी यांनी मेनका गांधी यांचे गांधी कुटुंबातील स्वागत आणि त्यानंतरचे कौटुंबिक कलहाचेही वर्णन पुस्तकात केले आहे.
1974 साली जेव्हा मेनका आनंद यांनी संजय गांधी यांच्यासोबत लग्न केले. तेव्हा देशातील सर्वात मोठ्या राजकीय कुटुंबातील त्या सदस्य झाल्या. मात्र कालांतराने इंदिरा गांधी यांच्यासोबत झालेल्या वादानंतर मनेका गांधी यांनी घर सोडले. सोनिया गांधी यांनी या घटनेची तुलना रिअॅलिटी शोसोबत केली आहे. आत्मचरित्र बिलॉन्गिंगः ए जर्नी ऑफ लव मध्ये त्यांनी मनेका गांधी कुटुंबात आल्यानंतर झालेले वाद आणि मतभेदाचा उल्लेख केला आहे. संजय गांधी यांची वाढती राजकीय महत्त्वकांक्षा आणि 1980मध्ये संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर झालेल्या घटनांचा उल्लेख आहे.
त्यांनी आत्मचरित्रात नमूद केले आहे की, 'संजय यांची ओळख मनेका यांच्यासोबत झाली. त्या एक सुंदर आणि चंचल मुलगी होती. संजय यांच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होती. व त्याकाळी अल्पवयीन होती. एक वर्षाच्या आतच त्यांनी लग्न केले आणि 18 वर्षांची मनेका गांधी कुटुंबात छोटी सूनबाई म्हणून आली.'
सोनिया यांनी पुढे लिहलं की, 'त्यांनी मनेका यांचे स्वागत केले. मनेका खूप उत्साही होती. सुरुवातीला घरात छोटी जाव म्हणून छान वाटलं. मात्र हळूहळू वातावरण बदलत गेले घरात वाद होण्यास सुरुवात झाली. जेव्हा मनेका उद्धटपणे उत्तर द्यायच्या तेव्हा शक्यतो मी टाळायचे. वाद होणं मला नको असायचं. पण जेव्हा मनेकाने हद्द ओलांडली तेव्हा मी कडक शब्दांत उत्तर द्यायची.'
पुढे त्या म्हणतात की, 'लग्नाच्या काही महिन्यानंतरच संजय आणि मनेका यांच्यातील मतभेददेखील समोर आले. त्यांच्यात सातत्याने वाद व्हायला लागले. जे घरातील इतर सदस्यांनाही जाणवू लागले. जेव्हा जेव्हा मनेका नाराज व्हायच्या तेव्हा त्या अपशब्द वापरायच्या. इंदिरा गांधी तिथे उपस्थित असतानाही त्या अपशब्द वापरायच्या.'
सोनिया गांधी यांनी असाही आरोप केला आहे की, 'मनेका कुटुंबातात टोमणे मारायची व पत्रकारांसोबत तिची ओळख निर्माण करत होती. तिच्या नजरेत आम्ही दुष्मन होतो. तिने काही पत्रकारांच्या माध्यमातून आमच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवण्याचे काम केले. 'आम्हाला सगळ्यात जास्त वाईट त्या खोट्या बातमीमुळं वाटलं की, पराभवानंतर मी आणि राजीव गांधी देश सोडून पळून जाणार होतो, असं काहींना पसरवलं होतं.'
संजय गांधी यांच्या निधनानंतर काय घडलं? मनेका यांना घर का सोडावं लागलं, याचाही उल्लेख सोनिया यांनी केला आहे. 'तिचा तीन महिन्यांचा मुलगा होता. तिला त्या बाळासोबत असायला हवं होतं. संयम ठेवायला हवा होता. स्वतःच्या राजकीय महत्त्वकांक्षी पूर्ण करण्यासाठी नंतर खूप वेळ मिळाला असता. मात्र मनेकाच्या योजना काही वेगळ्याच होत्या,' असं सोनिया गांधी लिहितात.
'वरुण यांच्या पहिल्या वाढदिवसाच्या आसपास मनेका आणि कुटुंबातील मतभेद पहिल्यांदा समोर आले. सोनिया यांनी म्हटलं आहे की, इंदिरा गांधी यांनी त्यांच्या नातवासाठी एक छोटी सभा आयोजित करण्याचा सल्ला दिला होती. मात्र नंतर त्यांना लक्षात आले की, ग्वालियरच्या वसुंधरा राजे यांच्या घरी एक पार्टी आयोजित केली आहे. राजे या आरएसएसचे समर्थन करतात आणि राजकारणात त्या इंदिरा गांधी यांच्या विरोधी आहेत. सोनिया यांनी पुढं लिहिलं आहे की, 'मनेकाने ते ठिकाण निवडल्याने इंदिरा गांधी यांना दुखः झालं. या निर्णयामुळं मनेकाने सगळ्या मर्यादा तोडल्या होत्या. माझ्या सासूबाईंसाठी जाणूनबुजून आव्हान दिल्यासारखं होतं.'
सोनिया गांधी पुढे लिहितात की, 'इंदिरा गांधी लंडन दौऱ्यावर गेल्या असताना मला लक्षात आले की, मनेका गांधी यांनी घरातून त्यांचं सामान बाहेर काढायला सुरुवात केली. जेव्हा इंदिरा गांधी परतल्या तेव्हा त्यांनी मनेका यांनी राजकारणातील वाढत्या हस्तक्षेपावर प्रश्न केला आणि म्हटलं की, हे सगळं करण थांबव नाहीतर हे घर सोडून निघून जा.'
त्यानंतर मनेका यांनी एका पत्रातून उत्तर दिलं की, 'त्यात त्यांनी इंदिरा गांधी यांच्यावरच आरोप केले. मनेकाने घर सोडून जाण्याची योजना आधीपासूनच बनवली होती. या वादाच्या एक आठवड्याआधीच एका पत्रकारासोबत याबाबत चर्चा केली होती. घर सोडल्यानंतर मनेका ने फक्त इंदिरागांधी यांच्यावरच नाही तर राजीव गांधी आणि माझ्यावरही आरोप केले. या घटनेला पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले, असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.'