सोन्याच्या वाढत्या किमती, सरकारचे सोनेखरेदी कमी करण्याचे निर्देश आणि युद्धामुळे बाजारपेठेवर परिणाम झाला. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर कारागिरांनी सोन्याच्या दागिन्यांऐवजी चांदीच्या दागिन्यांमधून आपली कलाकुसर दाखवण्यास सुरुवात केली आहे.
1/8
Golden days for silver
जडावाचे नक्षीकाम, मीनाकारी तसेच कर्नाटक-बंगाल येथील पारंपरिक कोरीवकाम हे झवेरी बाजारात दागिने तयार करणाऱ्या कारागीरांचे वैशिष्ट्य मानले जाते. केवळ मुंबईमध्येच नाही; तर देशाच्या कानाकोपऱ्यात या कारागिरांनी घडवलेल्या दागिन्यांना मोठी मागणी असते.
2/8
Golden days for silver
ऑर्डरप्रमाणे सोन्याच्या दागिने तयार करून ते दसऱ्याच्ऱ्या दिवशी ग्राहकांच्या हाती देण्यासाठी प्रत्येकवर्षी हे कारागीर व्यस्त असायचे. यंदा मात्र सोन्याचे हे तेज ओसरले असून त्याची जागा चांदीच्या लखलखाटाने घेतली आहे.
3/8
Golden days for silver
सोन्याचे गगनाला भिडलेले भाव, सोनेखरेदी कमी करण्याचे सरकारचे निर्देश आणि युद्धामुळे बाजारपेठेवर झालेला परिणाम, याचा फटका या कारागिरांनाही बसत आहे. ही बाजारपेठ आणि परंपरागत व्यवसाय टिकून राहावा, यासाठी त्यांनी आता चांदीच्या दागिन्यांमध्ये आपली कारागिरी दाखवण्यास सुरुवात केली आहे.
4/8
Golden days for silver
सोन्याच्या दागिन्यांइतका नफा चांदीच्या दागिन्यांमध्ये मिळत नसला, तरी परंपरागत कला टिकावी आणि कारागिरांचा चरितार्थ चालावा, यासाठी त्यांनी चांदीचे दागिने घडवण्याचा पर्याय स्वीकारला आहे.
5/8
Golden days for silver
मुंबई, मालाड, अंधेरी, दहिसर, झवेरी बाजार, मिरा-भाईंदर, ठाणे आणि भिवंडी अशा विविध ठिकाणी दीड लाखांहून अधिक कारागीर दागिने घडवण्याच्या व्यवसायात काम करत होते. त्यातील ८० टक्क्यांहून अधिक कारागीर हे कोलकात्यासह बंगालच्या विविध भागांतील आहेत.
6/8
Golden days for silver
दागिन्यांची मोठी दुकाने तसेच वैयक्तिक ग्राहकांकडून त्यांना दागिने तयार करण्याच्या ऑर्डर मिळत होत्या. मात्र, मागील वर्ष-दोन वर्षांपासून या कामाला ओहोटी लागली आहे. घडणावळीचे काम आता मोठ्या प्रमाणावर यंत्रांवर केले जाते.
7/8
Golden days for silver
दागिन्यांच्या कलाकुसरीकडे लक्ष झवेरी बाजारातील कारागिरांच्या कामाचा दागिन्यांच्या कलाकुसरीमध्ये वेगळा ठसा आहे. 'आता चांदीच्या दागिन्यांमध्येही वैविध्य आले आहे. या दागिन्यांमध्येही कलाकुसर कशी दाखवता येईल, यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून हा दसरा कारागिरांसाठी संस्मरणीय ठरणार आहे,' याकडे बंगाली स्वर्णशिल्पी कल्याण संघ आणि ऑल इंडिया स्वर्णशिल्पी एकता मंचाचे अध्यक्ष कालीदास सिन्हा यांनी लक्ष वेधले.
8/8
Golden days for silver
कटिंग, पॉलिशिंग आणि फ्रेमिंगसाठीही यांत्रिक पद्धतीचा वापर वाढला आहे. सोन्याच्या दरांनी उसळी घेतल्यामुळे दागिने तयार करून घेण्याकडे ग्राहकांचा कल कमी झाल्याचे येथील कारागीर सोनू राय यांनी सांगितले.