पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजना दीर्घकालीन बचत, नियमित उत्पन्न आणि तुलनेने स्थिर परताव्यासाठी पर्याय ठरू शकतात.
दीर्घकालीन बचत आणि निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनासाठी ही योजना उपयोगी ठरू शकते. नियमानुसार या योजनेतील गुंतवणूक, व्याज आणि मुदतपूर्तीची रक्कम करसवलतीस पात्र असते.
1/9
गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
केंद्र सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे व्याजदर कायम ठेवले आहेत. मात्र, भविष्यात या दरांमध्ये बदल होऊ शकतो. तसेच प्रत्येक योजनेचे करनियम, मुदतपूर्व पैसे काढण्याच्या अटी आणि गुंतवणुकीची मर्यादा वेगळी आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी पोस्ट ऑफिसमध्ये सध्याचे नियम तपासावेत.
2/9
कोणती योजना निवडावी?
तुमचे आर्थिक उद्दिष्ट काय आहे, यावर योग्य योजना अवलंबून असते. दीर्घकालीन बचतीसाठी PPF, पाच वर्षांच्या गुंतवणुकीसाठी NSC,दर महिन्याला उत्पन्न हवे असेल तर MIS, ठरावीक मुदतीच्या ठेवीसाठी टाइम डिपॉझिट तर मुलीच्या भविष्यासाठी बचतीसाठी सुकन्या समृद्धी योजना निवडू शकता. एकाच योजनेत सर्व पैसे गुंतवण्याऐवजी आपत्कालीन खर्च, गुंतवणुकीचा कालावधी आणि पैशांची गरज लक्षात घेऊन निर्णय घ्यावा.
3/9
शेअर बाजारापेक्षा या योजनांकडे गुंतवणूकदारांचा कल का?
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास नफा मिळण्याची शक्यता असते; पण बाजार घसरल्यास मूळ गुंतवणुकीचे मूल्यही कमी होऊ शकते. याउलट, पोस्ट ऑफिसच्या सरकारी अल्पबचत योजनांमध्ये लागू व्याजदरांनुसार परतावा मिळतो. त्यामुळे जोखीम कमी ठेवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी या योजना आकर्षक ठरतात.
4/9
सुकन्या समृद्धी योजना
याअंतर्गत व्याजदर वार्षिक 8.2% मिळतो. मुलीच्या नावाने दीर्घकालीन बचत करण्यासाठी ही सरकारी योजना आहे. पात्र मुलीच्या खात्यात नियमानुसार पैसे जमा करता येतात. या योजनेत व्याजदर तुलनेने जास्त असला, तरी खाते उघडण्याचे व पैसे काढण्याचे नियम लागू होतात.
5/9
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट
याअंतर्गत कालावधी: 1, 2, 3 किंवा 5 वर्षे असतो. 5 वर्षांच्या ठेवीचा व्याजदर वार्षिक 7.5% असेल. बँकेतील मुदत ठेवीप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्येही ठरावीक कालावधीसाठी पैसे ठेवता येतात. गुंतवणुकीचा कालावधी निवडण्याची सुविधा असल्याने विविध आर्थिक उद्दिष्टांसाठी हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो. पाच वर्षांच्या ठेवीवर पात्रतेनुसार करसवलत मिळू शकते.
6/9
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना
याअंतर्गत व्याजदर: वार्षिक 7.4% तर व्याज दर महिन्याला मिळते.निवृत्त व्यक्ती, गृहिणी किंवा ज्यांना नियमित उत्पन्नाची गरज आहे, त्यांच्यासाठी ही योजना विचारात घेता येते. गुंतवलेल्या रकमेवर नियमानुसार दर महिन्याला व्याज मिळते. मात्र, मिळणारे व्याज सामान्यतः करपात्र असते.
7/9
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
यामध्ये व्याजदर वार्षिक 7.7% असून गुंतवणुकीचा कालावधी 5 वर्षाचा असेल.
ठरावीक कालावधीसाठी पैसे गुंतवून बचत करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हा पर्याय आहे. व्याजाची गणना नियमानुसार होते आणि मिळणारे व्याज प्रमाणपत्राच्या खात्यात जमा होत जाते. पात्रतेनुसार मूळ गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत सवलत मिळू शकते.
8/9
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी
यामध्ये व्याजदर वार्षिक 7.1%, याचा कालावधी: 15 वर्षे असेल. तुम्ही किमान गुंतवणूक वर्षाला ₹500 रुपये तर कमाल गुंतवणूक वर्षाला ₹1.5 लाख करुया. दीर्घकालीन बचत आणि निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनासाठी ही योजना उपयोगी ठरू शकते. नियमानुसार या योजनेतील गुंतवणूक, व्याज आणि मुदतपूर्तीची रक्कम करसवलतीस पात्र असते.
9/9
शेअर बाजारात पैसा बुडाला? मग या 5 योजनांमध्ये करा गुंतवणूक; मिळतील चांगले रिटर्न्स!
शेअर बाजारातील चढ-उतारांमुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होत असेल, तर सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय शोधणे महत्त्वाचे ठरते. गेल्या काही काळात विशेषतः स्मॉल कॅप आणि मिड कॅप समभागांमधील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांना फटका बसला आहे. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजना दीर्घकालीन बचत, नियमित उत्पन्न आणि तुलनेने स्थिर परताव्यासाठी पर्याय ठरू शकतात.