संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केलेल्या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा असतानाच खरोखरच त्यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे घडलं तर राजकीय समीकरण किती बदलेल जाणून घेऊयात सविस्तरपणे...
सध्या सत्तेत असलेल्या भाजपा, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे एकूण किती आमदार आहेत? नेमकं सत्तेतील पक्षांचं संख्याबळ किती आणि 20 ते 22 आमदार पक्षातून बाहेर पडले तर काय होईल?
1/9
राऊतांचा 'तो' दावा खरा ठरला तर?
खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील पक्षाबद्दल केलेला खळबळजनक दावा खरा ठरला तर राजकीय आकडेमोड कशी बदलू शकते? याचा सरकारवर परिणाम होईल का? झाला तर कसा होईल? याबद्दलच जाणून घेऊयात...
2/9
संजय राऊत यांचा मोठा दावा
"सुनेत्रा पवारांचा म्हणजेच अमित शाहांचा पक्ष आहे त्यातील 20 ते 22 आमदार कधीही बाहेर पडतील. ते बाहेर पडण्याच्या मानसिकतेत आहेत," असं विधान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी केलं आहे. सुनेत्रा पवारांच्या आमदारांनी शरद पवारांकडे भेटीसाठी वेळ मागितल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी हे विधान केलं आहे.
3/9
गप्पा मारण्यासाठी भेटत नाहीयेत
"सुनेत्रा पवारांच्या पक्षातील आमदार शरद पवारांना फक्त गप्पा मारण्यासाठी भेटत नाहीयेत. अजित पवारांचं नेतृत्व राहिलेलं नाही. एकाप्रकारे त्यांना गुलामी करावी लागत आहे, स्वाभिमान गहाण ठेवावा लागत आहे. अशा स्थितीत एक तर ते स्वगृही परततील, आणि त्याला विलीनीकरण म्हणत नाहीत. किंवा मग ते निवडणुकीच्या आधी एखाद्या दुसऱ्या पक्षात प्रवेश करतील. पण अमित शाहांचा हा पक्ष पुन्हा एकदा फुटेल," असा दावा संजय राऊतांनी केला आहे.
4/9
सुनेत्रा पवारांच्या पक्षातून 20 ते 22 आमदार बाहेर पडले तर...
संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यानुसार खरोखरच सुनेत्रा पवारांच्या पक्षातून 20 ते 22 आमदार बाहेर पडले तर त्यांच्याकडे किती आमदार राहतील? यामुळे सध्या सत्तेत असलेल्या सरकारला धोका निर्माण होईल का? नेमकं सरकारचं संख्याबळ किती आहे? सुनेत्रा पवारांच्या पक्षात, शरद पवारांच्या पक्षात सध्या किती आमदार आहेत? याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात...
5/9
सत्तेतल्या दोन मुख्य पक्षांकडे किती आमदार?
सध्याच्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) हा 132 आमदारांसहीत सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपाबरोबर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 57 आमदार 2024 मध्ये निवडून आले आहेत.
6/9
अजित पवारांच्या नेतृत्वाखाली किती आमदार निवडून आले?
तर अजित पवारांच्या नेतृत्वाखाली 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत 41 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळेच खरोखरच 20 ते 22 आमदारांनी पक्ष सोडला तर सुनेत्रा पवारांसोब 18 ते 20 आमदार राहतील.
7/9
शरद पवारांकडे सध्या किती आमदार?
दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षाचे 10 आमदार 2024 च्या निवडणुकीमध्ये जिंकले असून खरोखरच सुनेत्रा पवारांची साथ सोडून 20 ते 22 आमदार शरद पवारांसोबत गेले तर त्यांच्याकडील आमदारांची संख्या सुनेत्रा पवारांच्या पक्षापेक्षा अधिक म्हणजे 30 ते 32 इतकी होईल.
8/9
एकट्या भाजपाकडे 132 जागा
मात्र हे आमदार सोडून गेले तर सरकारला कोणताही धोका नाहीये. कारण एकूण 288 जागा असलेल्या विधानसभेतील बहुमत हे 145 आहे. एकट्या भाजपाकडे 132 जागा आहेत. त्यांना शिंदेंच्या 57 आमदारांचा पाठिंबा आहे.
9/9
सरकार कोसळणार नाही
सुनेत्रा पवारांकडे 18 ते 20 आमदार उरले तरी सरकार कोसळणार नाही. कारण शिंदे सेनेचे 57 आमदार, सुनेत्रा पवारांचे 20 आमदार आणि भाजपा आमदारांची एकूण संख्या 200 हून अधिक आहे. ही संख्या 144 पेक्षा फारच जास्त असल्याने सरकारला कोणताही धोका नाही. (सर्व फोटो प्रातिनिधिक)