17 नोव्हेंबर रोजी किती आहे LPG गॅस सिलेंडरचे रेट्स? जाणून घ्या तुमच्या शहरातील घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती
LPG Gas Cylinder : LPG गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये चढ उतार झाल्यास त्याचा थेट परिणाम हा ग्राहकांच्या बजेटवर होत असतो. तेव्हा आज LPG गॅस सिलेंडरचे रेट्स किती आहेत? त्यांच्यात काही वाढ झाली आहे का? याविषयी जाणून घेऊयात.
LPG Gas Cylinder Rates Today : सरकारी तेल मार्केटिंग कंपन्या दररोज सकाळी 14.2 किलोग्रामच्या घरगुती आणि 19 किलोग्रामच्या व्यावसायिक सिलेंडरचे ताजे रेट्स जाहीर करत असतात. अधिकतरवेळा महिन्याच्या पहिल्या तारखेला कंपन्यांकडून गॅस सिलेंडरच्या दरात बदल केला जातो. त्याप्रमाणे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये वाढ झालेली होती. मात्र त्या तुलनेत सर्वसामान्यांना महागाईची झळ बसू नये यासाठी मागील अनेक महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढवण्यात आलेल्या नाहीत. तेव्हा आज घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या ताज्या किंमती किती आहेत याविषयी जाणून घेऊयात.
तुमच्या शहरातील घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती :
दिल्ली 939.50 रुपये
नोएडा 939.50 रुपये
मुंबई 941.50 रुपये
कोलकाता 968.00 रुपये
पटना 1,031.50 रुपये
बेंगलुरु 944.50 रुपये
भुवनेश्वर 968.00 रुपये
वाराणसी 979.50 रुपये
लखनऊ 979.50 रुपये
हेही वाचा : ड्रेसिंग रूममध्ये घुसून सचिन तेंडुलकरला कोणी दिली ऑफर? मद्य आणि तंबाखूच्या जाहिरातीबाबत सचिनचा खुलासा
तुमच्या शहरातील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती :
दिल्ली 2,820.00 रुपये
नोएडा 2,757.50 रुपये
मुंबई 2,774.50 रुपये
कोलकाता 2,964.00 रुपये
पटना 3,110.50 रुपये
बेंगलुरु 2,774.00 रुपये
भुवनेश्वर 3,004.00 रुपये
वाराणसी 2,942.00 रुपये
लखनऊ 2,932.50 रुपये
व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतींमुळे खिशाला फटका :
जून महिन्यापासून घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती स्थिर असल्या, तरी 19 किलोचे एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांच्या खर्चात वाढ झाली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत होत असलेली सततची वाढ ही लहान आणि मोठ्या अशा दोन्ही प्रकारच्या व्यवसायांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून किंमती सातत्याने वाढत आहेत. मोठ्या हॉटेल्सपासून ते रस्त्याकडची उपहारगृह आणि रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या छोट्या विक्रेत्यांपर्यंत, सर्वांसाठी इंधन हा खर्चाचा सर्वात मोठा घटक आहे. त्यामुळे किमतींमधील या वाढीचा थेट परिणाम त्यांच्या नफ्याच्या मार्जिनवर होत आहे. तसेच त्यामुळे त्यांच्याकडून विक्री केल्या जाणाऱ्या वस्तूंचे भाव सुद्धा वाढत आहेत.