• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /ड्रेसिंग रूममध्ये घुसून सचिन तेंडुलकरला कोणी दिली ऑफर? मद्य आणि तंबाखूच्या जाहिरातीबाबत सचिनचा खुलासा

ड्रेसिंग रूममध्ये घुसून सचिन तेंडुलकरला कोणी दिली ऑफर? मद्य आणि तंबाखूच्या जाहिरातीबाबत सचिनचा खुलासा

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरने 1996 च्या वर्ल्ड कप दरम्यान तो कोणतेही स्टिकर न लावलेल्या बॅटने का खेळला याबाबत सांगितले, तसेच मद्य आणि तंबाखूच्या जाहिराती प्रमोट न करण्याच्या निर्णयाबाबत सुद्धा त्याने खुलासा केला.

Reported Bypooja pawar
Published: Nov 17, 2026, 08:00 IST|Updated: Nov 17, 2026, 08:42 IST
joinshare
ड्रेसिंग रूममध्ये घुसून सचिन तेंडुलकरला कोणी दिली ऑफर? मद्य आणि तंबाखूच्या जाहिरातीबाबत सचिनचा खुलासा
Image Credit: ड्रेसिंग रूममध्ये घुसून सचिन तेंडुलकरला कोणी दिली ऑफर?

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Sachin Tendulkar : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्याला 16 नोव्हेंबर 2026 रोजी 13 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने वानखेडे स्टेडियममध्ये असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशन एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालयात भारतरत्न सचिन तेंडुलकरला समर्पित असलेल्या 'बॅटोग्राफी' या अनोख्या दालनाचे अनावरण करण्यात आले. या दालनात सचिन तेंडुलकरच्या पहिल्या बॅटपासून ते शेवटच्या टेस्ट सामन्यातील बॅट पर्यंत अशा 26 बॅटचं कलेक्शन या दालनात असून याशिवाय सचिनचे काही हेडगेअर्स आणि वस्तू सुद्धा येथे ठेवण्यात आलेल्या आहेत. यानिमित्ताने संवाद साधताना सचिनने तो करिअरच्या सुरुवातीला बराचकाळ बॅटवर कोणतेही स्टिकर लावून का खेळत नव्हता याबाबतचा किस्सा सांगितला.

बॅटवर कोणतेही स्टिकर लावून का खेळत नव्हता?

सचिन तेंडुलकरने यावेळी संवाद साधताना 1996 च्या वर्ल्ड कप दरम्यानचा एक किस्सा सांगितला. सचिन म्हणाला की, 1996 च्या वर्ल्ड कप दरम्यान त्याला अशी एक ऑफर मिळाली होती, परंतु त्याने ती स्वीकारली नाही'. सचिन म्हणाला की त्यानंतर सुमारे दोन वर्षे तो कोणत्याही कंपनीचे स्टिकर नसलेली बॅट वापरून खेळला.

सचिन म्हणाला की, '1996 च्या वर्ल्ड कपच्या सुरुवातीला मला सुरुवातीच्या दोन सामन्यात मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला. कोणतेही स्टिकर न लावलेल्या बॅटने खेळून मला तेव्हा खूप चांगलं वाटत होतं. तसेच त्याकाळात जर तुम्ही कोणत्या खेळाडू किंवा मॅनेजरला भेटत असाल तर सामन्याच्या दरम्यान सुद्धा तुम्ही खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊ शकत होतात'.

हेही वाचा : 'माझ्या शरीराचा भाग काढून देतोय...', पहिल्या बॅटपासून ते अखेरच्या टेस्टपर्यंत, MCA म्यूजियममध्ये सचिन तेंडुलकरच्या बॅटोग्राफी दालनाचे अनावरण

सचिन तेंडुलकरने पुढे सांगितलं की, ' आम्ही वानखेडेवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळत होतो. आम्ही दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी केली होती. मला लक्षात आहे की  एका परदेशी कंपनीचे डायरेक्टर ड्रेसिंग रूममध्ये आले. मला कंपनीचं नाव घेऊ इच्छित नाही पण त्यांची कंपनी आधी सुद्धा माझ्या सोबत बातचीत करत होती. ते म्हणाले की आम्ही तुमच्या सर्व अटी मान्य करण्यासाठी तयार आहोत, तुम्ही आमच्या कंपनीचा स्टिकर तुमच्या बॅटवर लावा. मात्र मी तेव्हा त्यांना म्हणाला की मी जरा अंधविश्वासू आहे. स्टिकर न लावलेल्या बॅटने खेळल्याने माझ्या चांगल्या धावा होत आहेत. तेव्हा वर्ल्ड कप संपल्यावर यावर बोलूयात'.  

सचिन म्हणाला त्याकाळात सुद्धा अनेक मद्य आणि तंबाखूच्या जाहिरातींसाठी त्याला ऑफर येत होत्या. माझ्या वडिलांना दिलेला शब्द आणि स्वइच्छेने घेतलेल्या काही निर्णयांमुळे मी माझ्या आयुष्यात कधीही मद्य आणि तंबाखूच्या जाहिराती केल्या नाहीत आणि करणार देखील नाही. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sachin Tendulkar
Marathi News
Cricket News
Team india