SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'मी सीतारामचा जाप करत होतो...' आर्यवीर वडील वीरेंद्र सेहवागला केला Video कॉल, सांगितली विजयाची कहाणी

भारताचा माजी दिग्गज क्रिकेटर वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर याने भारताकडून अंडर 19 आशिया कपमध्ये खेळताना जबरदस्त कामगिरी केली आणि त्याला याकरता प्लेअर ऑफ द टूर्नामेंट पुरस्कार सुद्धा मिळाला. विजयानंतर ओमानवरून आर्यवीरने वीरेंद्र सेहवागला व्हिडीओ कॉल केला.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 15, 2026, 01:30 PM IST | Updated: Nov 15, 2026, 02:09 PM IST
Image Credit: 'मी सीतारामचा जाप करत होतो...' आर्यवीरने वडील वीरेंद्र सेहवागला केला Video कॉल, सांगितली विजयाची कहाणी
Join

Virendra Sehwag And Aaryavir Sehwag Video Call : भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज क्रिकेटर वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर हा अंडर 19 आशिया कपमध्ये टीम इंडियाचा भाग होता. या स्पर्धेतील जबरदस्त परफॉर्मन्समुळे त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार सुद्धा मिळाला. आर्यवीरने आशिया कपमध्ये तीन अर्धशतक आणि एक शतक ठोकलं यासह त्याने एकूण 361 धावा केल्या. पाकिस्तान विरुद्ध अंतिम सामन्यात आर्यवीरने 61 बॉलमध्ये 58 धावांची खेळी केली. याद्वारे त्याने कर्णधार लक्ष्य रायचंदानीसोबत मिळून, विजयाचं टार्गेट पूर्ण करताना भारतीय संघाला एक भक्कम सुरुवात करून दिली.

टॉप ऑर्डर फलंदाजांनंतर भारतीय संघाला मधल्या फळीत संघर्ष करावा लागला आणि सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगला. मात्र शेवटच्या बॉलवर मोहित उलवाने चौकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. अंतिम सामन्यातील या थरारक विजयानंतर आर्यावीरने ओमानमधून आपले वडील वीरेंद्र सेहवाग यांना व्हिडिओ कॉल केला, जेणेकरून तो तिथले विजयाचे वातावरण त्यांच्यासोबत शेअर करू शकेल आणि घडलेल्या सर्व गोष्टी त्यांना सांगू शकेल.

हेही वाचा : पाकिस्तानला धूळ चरत U19 आशिया कप जिंकणाऱ्या टीम इंडियाला किती प्राईज मनी मिळणार? BCCI ने केलं स्पष्ट

वडील वीरेंद्र यांना काय म्हणाला आर्यवीर?

आर्यवीरने ओमानमध्ये सामना जिंकल्यावर वडील वीरेंद्र सेहवाग यांना व्हिडीओ कॉल केला. यावेळी तो म्हणाला की, 'मी एक तासापासून बसलो होतो. मी सीताराम.. सीताराम.. चा जाप करत होतो. मी काहीतरी काहीही घडण्याची अपेक्षा करत होतो. मग शेवटच्या ओव्हरला 8 धावांची गरज होती. जो गोलंदाज होता तोच फलंदाजी करत होता. शेवटच्या बॉलवर 3 धावा हव्या होत्या. मी फक्त एका चौक्याची इच्छा करत होतो आणि तसंच घडलं! सगळे खूप आनंदी झाले'.

तो पुढे म्हणाला, 'जेव्हा मला दुखापत झाली, तेव्हा फिजिओ दोन तीनदा मैदानावर येऊन माझी विचारपूस करत होते. तिथे सुमारे 2000 पाकिस्तानी चाहते उपस्थित होते आणि ते सर्वजण 'सहवाग… सहवाग!' अशी ओरडत होते. अगदी पाकिस्तानी चाहतेही आम्हाला पाठिंबा देत होते. तो एक अतिशय अद्भुत अनुभव होता'. भारतीय संघाने पाकिस्तानवर 1 विकेटने विजय मिळवून सामना जिंकला. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES