• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /पाकिस्तानला धूळ चरत U19 आशिया कप जिंकणाऱ्या टीम इंडियाला किती प्राईज मनी मिळणार? BCCI ने केलं स्पष्ट

पाकिस्तानला धूळ चरत U19 आशिया कप जिंकणाऱ्या टीम इंडियाला किती प्राईज मनी मिळणार? BCCI ने केलं स्पष्ट

U19 Asia Cup 2026 : पाकिस्तानला अंडर 19 आशिया कप 2026 च्या फायनलमध्ये पराभूत करणाऱ्या युवा टीम इंडियाचं सर्वत्र कौतुक होत आहे. अशातच या संघाला आता किती प्राईजमनी मिळणार याबाबत अनेकांमध्ये उत्सुकतता निर्माण झालेली आहे. याबाबत BCCI च्या सचिवांनी स्पष्ट केलं आहे.

Reported Bypooja pawar
Published: Nov 15, 2026, 12:31 PM IST|Updated: Nov 15, 2026, 01:25 PM IST
joinshare
पाकिस्तानला धूळ चरत U19 आशिया कप जिंकणाऱ्या टीम इंडियाला किती प्राईज मनी मिळणार? BCCI ने केलं स्पष्ट
Image Credit: पाकिस्तानला धूळ चारत U19 आशिया कप जिंकणाऱ्या टीम इंडियाला किती प्राईज मनी मिळणार? BCCI ने केलं स्पष्ट

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

U19 Asia Cup 2026 : भारतीय अंडर 19 क्रिकेट संघाने अंडर 19 आशिया कप 2026 वर नाव कोरलं आहे. 2022 नंतर प्रथमच टीम इंडियाने या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं असून गतविजेत्या पाकिस्तानला त्यांनी धूळ चारली आहे. भारतीय संघाने फायनल सामन्यात 1 विकेटने रोमांचक विजय मिळवला. टीम इंडियाला विजयासाठी पाकिस्तानने 338 धावांचं मोठं टार्गेट दिलं होतं. हे टार्गेट पूर्ण करताना भारतीय संघ संघर्ष करत होता, मात्र अखेरच्या ओव्हरमध्ये युवा फलंदाजांनी पाकिस्तानच्या जबड्यातून विजय खेचून आणला. या विजयानंतर चॅम्पियन U19 भारतीय पुरुष संघाला किती प्राईजमनी मिळणार याबाबत अनेकांमध्ये उत्सुकतता निर्माण झालेली आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव देवजीत सैकियाने युवा खेळाडूंच्या धाडसाचं कौतुक केलं आणि त्यांना किती प्राईजमनी मिळणार याप्रश्नावर सुद्धा उत्तर दिलं.

अंडर 19 टीम इंडियाला किती प्राईज मनी मिळणार?

अंडर 19 आशिया कपमध्ये भारतीय संघाला  मिळालेल्या या विजयानंतर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकियाने खेळाडूंचं भरभरून कौतुक केलं. ANI शी बोलताना सचिव देवजीत सैकिया म्हणाले की तरुण खेळाडूंना आर्थिक बक्षिसांविषयीच्या चर्चेपासून दूर ठेवले पाहिजे, जेणेकरून ते पूर्णपणे आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकतील. देवजित सैकिया यांनी म्हटले, 'हे खेळाडू अजून खूप लहान आहेत. कृपया त्यांच्यासमोर बक्षीस रक्कम किंवा आर्थिक लाभांसारखे विषय काढू नका,त्यांचे संपूर्ण लक्ष केवळ त्यांच्या खेळावरच असायला हवे. पैसे आणि बक्षिसे मिळवण्यासाठी त्यांच्यासमोर संपूर्ण आयुष्य पडलेले आहे, परंतु आज त्यांना मिळालेला अनुभव आणि आत्मविश्वास त्यांच्या भविष्यातील कारकिर्दीसाठी सर्वात मोठी प्रेरणा ठरेल. यापेक्षा मौल्यवान दुसरी कोणतीही गोष्ट असू शकत नाही'.

हेही वाचा : शेवटच्या ओव्हरचा रोमांच, पाकिस्तानच्या जबड्यातून कसा खेचून आणला विजय? जाणून घ्या 'त्या' ओव्हरमध्ये काय काय घडलं?

आक्रमक सेलिब्रेशनबाबत काय म्हणाले देवजीत सैकिया?

अंडर 19 आशिया कप फायनलमध्ये शेवटच्या बॉलवर चौकार लगावून भारतीय खेळाडूंनी विजय पाकिस्तानच्या जबड्यातून खेचून आणला. त्यानंतर भारतीय युवा खेळाडूंनी आनंदाच्या भरात पाकिस्तानी डग आउटच्याजवळ जाऊन आक्रमक सेलिब्रेशन केलं. यावर काहींनी सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं. मात्र बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी खेळाडूंची पाठराखण केली आहे.  त्यांनी सांगितले की हा आनंदोत्सव खेळाडूंच्या कधीही हार न मानणाऱ्या वृत्तीचे दर्शन घडवतो आणि अत्यंत कठीण परिस्थितीत सामना जिंकल्यानंतर त्यांना आनंद साजरा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Cricket News
Team india