• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /मुंबई इंडियन्सचा हेड कोच बनताच कायरन पोलार्डचा मोठा निर्णय, 'या' संघाला ठोकला रामराम

मुंबई इंडियन्सचा हेड कोच बनताच कायरन पोलार्डचा मोठा निर्णय, 'या' संघाला ठोकला रामराम

Kieron Pollard : मुंबई इंडियन्स संघाचा हेड कोच झाल्यावर 39 वर्षीय कायरन पोलार्डने आता साउथ आफ्रिका लीग SA20 मध्ये जोबर्ग सुपर किंग्स या चेन्नई सुपरकिंग्सशी सलग्न असणाऱ्या फ्रेंचायझीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

Reported Bypooja pawar
Published: Oct 26, 2026, 06:29 AM IST|Updated: Oct 26, 2026, 07:17 AM IST
joinshare
मुंबई इंडियन्सचा हेड कोच बनताच कायरन पोलार्डचा मोठा निर्णय, 'या' संघाला ठोकला रामराम
Image Credit: मुंबई इंडियन्सचा हेड कोच बनताच कायरन पोलार्डचा मोठा निर्णय

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Kieron Pollard : आयपीएल 2026 नंतर महेला जयवर्धनेनं मुंबई इंडियन्सचं हेड कोचपद सोडलं. त्यानंतर आयपीएल 2027 साठी मुंबई इंडियन्स संघाने 16 वर्षांपासून त्यांच्या संघाचा भाग असलेल्या कायरन पोलार्ड याच्यावर हेड कोच पदाची जबाबदारी सोपवली. कायरन पोलार्ड याला मुंबई इंडियन्सने हेड कोच बनवलं असलं तरी वेस्ट इंडिजचा हा 39 वर्षीय खेळाडू इतर परदेशी लीगमध्ये खेळाडू म्हणून खेळतो. मुंबई संघाचा हेड कोच झाल्यावर पोलार्डने आता साउथ अफ्रीकी लीग SA20 मध्ये जोबर्ग सुपर किंग्स या चेन्नई सुपरकिंग्सशी सलग्न असणाऱ्या फ्रेंचायझीमधून बाहेर पडला आहे.  

मुंबई इंडियन्सने हेड कोच पदाची दिली संधी :

महेला जयवर्धने हा मुंबई इंडियन्सच्या हेड कोच पदावरून बाजूला झाल्यावर हे पद काही दिवसांपासून रिक्त होते. नोव्हेंबर महिन्याच्या 15  तारखेपर्यंत आयपीएल फ्रेंचायझींना आयपीएल 2027 साठी त्यांच्या संघातील रिटेन आणि रिलीज खेळाडूंची नावं जाहीर करावी लागणार आहेत. तसेच डिसेंबर महिन्यात सुद्धा आयपीएल 2027 चं मिनी ऑक्शन पार पडेल. त्यासाठी मुंबई इंडियन्सला खेळाडूंची निवड करावी लागेल. जवळपास 16 वर्षांपासून कायरन पोलार्ड हा मुंबई इंडियन्सचा भाग आहे. त्याची सुरुवात ही संघात खेळाडू पासून झाली होती, तर 2022 मध्ये त्याने आयपीएलमधून खेळाडू म्हणून निवृत्ती घेतली आणि त्यानंतर तो फलंदाजी कोच म्हणून मुंबई इंडियन्समध्ये रुजू झाला. त्यानंतर आता पोलार्डला थेट हेड कोच पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

हेही वाचा : भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या सामन्याचं ठिकाण बदललं, किती वाजता सुरु होणार सामना? पाहा संपूर्ण डिटेल्स

जोबर्ग सुपर किंग्सची सोडली साथ :

पोलार्डने मुंबई इंडियन्समध्ये हेड कोच पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर  साउथ अफ्रीकी लीग SA20 मध्ये जोबर्ग सुपर किंग्सची साथ सोडली आहे. जोबर्ग सुपर किंग्स हा संघ चेन्नई सुपरकिंग्सशी सलग्न असणाऱ्या फ्रेंचायझीचा भाग आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर पोलार्डने जोबर्ग सुपर किंग्सशी जी चेन्नई सुपर किंग्सशी संबंधित SA20 फ्रँचायझी आहे आपले संबंध तोडले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील SA20 लीगमध्ये, जोबर्ग सुपर किंग्सने पोलार्डला 1.5 मिलियन रँड देऊन आपल्या संघात सामील केले, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पोलार्ड पहिल्यांदाच या संघाचा भाग बनला आहे. मात्र सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी सांगितले की, पोलार्डने त्यांना कळवले आहे की तो 2027 च्या SA20 स्पर्धेत जोबर्गसाठी खेळू शकणार नाही. त्यामुळे आता संघ एका नवीन खेळाडूचा शोध घेणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
IPL
Mumbai
Cricket News
Marathi News
Marathi Batmya