वीरेंद्र सेहवागच्या मुलाचा U19 एशिया कपमध्ये धमाका! भारतासाठी ठोकलं शतक
Aryaveer Sehwag Century : माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने पुरुष अंडर 19 आशिया कपमध्ये भारतीय संघाकडून खेळताना शतक पूर्ण केलं. यावेळी 31 बॉलमध्ये आर्यवीरने शतक पूर्ण केलं.
Aryaveer Sehwag Century : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर हा सध्या पुरुष अंडर 19 आशिया कपमध्ये टीम इंडियाचा भाग आहे. आज भारत विरुद्ध यूएई यांच्यात झालेल्या सामन्यात आर्यवीरने हा फक्त 131 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. आर्यवीरचं या स्पर्धेतील हे पहिलं शतक होतं. आपलं शतक पूर्ण करण्यासाठी आर्यवीरने 13 चौकार, 2 षटकार लगावले. यापूर्वी नेपाळ विरुद्ध आर्यवीरने 70 धावांची नाबाद खेळी केलेली. पाकिस्तान विरुद्ध सामन्यात आर्यवीरची बॅट नीट चालली नाही. पाकिस्तान विरुद्ध आर्यवीर हा फक्त 22 धावा करू शकला होता.
भारत विरुद्ध यूएई या सामन्यादरम्यान आर्यवीरने यूएईच्या गोलंदाजांचा चांगला सामना केला. या दरम्यान कर्णधार लक्ष्य रायचंदानीची सुद्धा चांगली साथ आर्यवीरला मिळाली आणि दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 62 धावांची पार्टनरशिप झाली. लक्ष्य क्रीजवर जास्त वेळ टिकू शकला नाही आणि 32 बॉलमध्ये 17 धावा करून बाद झाला. लक्ष्य बाद झाल्यानंतर, आर्यवीरने व्ही. के. विनीतसोबत मिळून शतकी भागीदारी केली.
यूएई विरुद्ध विजय तर पाकिस्तान विरुद्ध पराभव :
भारतासाठी ग्रुप ए मध्ये यूएई विरुद्ध सामन्यात विजय मिळवणं खूप गरजेचं आहे. स्पर्धेत टीम इंडियाने नेपाळ विरुद्ध सामना जिंकून दमदार सुरुवात केलेली. मात्र पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला, ज्यामुळे परिस्थिती गुंतागुंतीची झाली. नेपाळविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट गोलंदाजी करत त्यांना 128 धावांवर रोखले. तर भारतीय संघाने 185 बॉलमध्ये शिल्लक असताना 10 विकेट राखून विजय मिळवला होता.
तर पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. मात्र फलंदाजीत टीम इंडियाची अवस्था वाईट झाली. अर्जुन राजपूतला सोडून टीम इंडिया धावा करण्यात संघर्ष करताना दिसली. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी केली आणि त्यांचा संपूर्ण संघ 208 धावांत बाद झाला. प्रत्युत्तरात, पाकिस्तानने 11 बॉल शिल्लक असताना 3 विकेट राखून सामना जिंकला.