• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /पावसामुळे तिसऱ्या सामन्यावर पाणी फेरलं! भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना रद्द करण्याची वेळ, क्रिकेट प्रेमींची निराशा

पावसामुळे तिसऱ्या सामन्यावर पाणी फेरलं! भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना रद्द करण्याची वेळ, क्रिकेट प्रेमींची निराशा

IND VS NZ 3rd Match ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात आलेल्या वनडे सीरिजमधील तिसरा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्याची वेळ आली. त्यामुळे आता न्यूझीलंडला भारताविरुद्ध या सीरिजमध्ये आघाडी घेता येणार नाही.

Reported Bypooja pawar
Published: Nov 10, 2026, 12:05 IST|Updated: Nov 10, 2026, 12:39 IST
joinshare
पावसामुळे तिसऱ्या सामन्यावर पाणी फेरलं! भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना रद्द करण्याची वेळ, क्रिकेट प्रेमींची निराशा
Image Credit: पावसामुळे तिसऱ्या सामन्यावर पाणी फेरलं! भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना रद्द करण्याची वेळ, क्रिकेट प्रेमींची निराशा

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

IND VS NZ 3rd Match ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे सीरिज खेळवण्यात येत आहे. या वनडे सीरिजचा तिसरा सामना हा 10 नोव्हेंबर रोजी सेडन पार्क, हॅमिल्टन येथे खेळवला जाणार होता. मात्र सामना सुरु होण्याच्या आधीपासूनच पाऊस व्यत्यय आणत असल्याने अखेर हा सामना रद्द करण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे  पाच सामन्यांच्या या सीरिजमध्ये भारताने पहिले दोन सामने जिंकून 2-0 ने आघाडी घेतली होती. जर का आजचा सामना झाला असता तर यात न्यूझीलंडला भारतावर मात करून सीरिजमध्ये पुढील सलग तीन सामने जिंकून सीरिज जिंकण्याची संधी होती. मात्र आता न्यूझीलंड उर्वरित दोन्ही सामने जिंकून भारताशी केवळ बरोबरी करू शकते ते आघाडी घेऊ शकणार नाहीत. सामना रद्द झाल्याने अनेक प्रेक्षक नाराज झाले. 

टीम इंडिया सीरिजमध्ये पराभूत होणार नाही :

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसरा सामना रद्द झाल्याने याचा भारतीय संघाला मोठा फायदा झाला आहे. आता हा सामना रद्द झाल्याने सीरिजमध्ये भारताचा पराभव होईल ही शक्यता आता पूर्णपणे टळली आहे. भारताने आधीच न्यूझीलंड विरुद्ध पाच सामन्यांच्या सीरिजपैकी दोन सामने जिंकलेत. त्यामुळे यजमान न्यूझीलंडला ही सीरिज जिंकायची होती तर त्यासाठी त्यांना तिसरा, चौथा आणि पाचवा सामना जिंकणं महत्वाचं होतं. मात्र आता तसं होऊ शकणार नाही. न्यूझीलंडचा संघ पुढील दोन सामने जिंकून भारतासोबत सीरिजमध्ये बरोबरी साधू शकते,  मात्र ते ही सीरिज आघडी घेऊन जिंकू शकत नाहीत. 

हेही वाचा : जानेवारीमध्ये IPL खेळवण्याची मागणी, KKR ची मालकीण जुही चावलाने केली पोस्ट

भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सीरिज  :

भारतीय संघ :

रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), नमन धीर, अंशुल कंबोज, औकिब नबी, गुरनूर बराड़, अर्शदीप सिंह, ऋतुराज गायकवाड़, मोहम्मद सिराज, ईशान किशन, कुलदीप यादव.

न्यूझीलंडचा संघ :

विल यंग, ​​टिम सीफर्ट, हेनरी निकोल्स, डेरिल मिचेल, टॉम लैथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिशेल सैंटनर (कर्णधार), नाथन स्मिथ, काइल जैमीसन, जैकब डफी, मैथ्यू फिशर, क्रिस्टियन क्लार्क, माइकल ब्रेसवेल, निक केली.

पहिले दोन वनडे भारताने जिंकले :

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरुवातीच्या दोन सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे अत्यंत चुरशीचे विजय मिळवले. सीरिजमधील पहिल्या वनडे सीरिजमधील पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रभावित झाला. यात भारतने 5 विकेट्स राखून विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात गोलंदाज आणि फलंदाज असघ दोघांनी देखील केलेल्या चांगल्या कामगिरीने न्यूझीलंडवर  ४ धावांनी विजय मिळवण्यात भारतीय संघाला यश आले. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Cricket News
Mumbai News
Team india