SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक जिल्ह्यात CNG आणि PNG च्या दरात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे इंधन दर

Fuel Rates Today : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक जिल्ह्यात CNG आणि PNG च्या दरात वाढ झाली आहे. सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेल सारख्या इंधनाचे ताजे दर जाहीर केलेत.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 13, 2026, 09:34 IST | Updated: Nov 13, 2026, 09:56 IST
Image Credit: आजच्या पेट्रोल, डिझेल आणि CNG च्या किंमती
Join

Fuel Rates Today : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक जिल्ह्यात आज 13 नोव्हेंबर 2026 रोजी CNG आणि PNG च्या दरात वाढ झाली आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडनं दरवाढीची घोषणा केली असून मध्यरात्रीपासून नवे दर लागू झालेत. CNG च्या दरात प्रतिकिलो 1 रुपया 25 पैशांची वाढ झालीये. त्यामुळे CNG चा नवा दर 99 रुपये 75 पैसे प्रतिकिलो झालाय तर घरगुती PNG च्या दरात 1 रुपया 50 पैशांची वाढ झाली आहे. घरगुती PNG चा दर 51 रुपये 75 पैशांवर गेला आहे. गॅस इनपुट खर्च आणि आयात केलेल्या LNG च्या किंमतीत वाढ झाल्यानं दरवाढीचा निर्णय घेतलाय.

13 नोव्हेंबर रोजी तुमच्या शहरातील पेट्रोलच्या किंमती (प्रतिलिटर) :

नवी दिल्ली : 102.12 रुपये प्रति लीटर

मुंबई : 111.21 रुपये प्रति लीटर

चेन्नई : 107.76 रुपये प्रति लीटर

कोलकाता : 113.51 रुपये प्रति लीटर

बेंगळुरू : 111.68 रुपये प्रति लीटर

हैदराबाद : 116.15 रुपये प्रति लीटर

नोएडा : 102.12 रुपये प्रति लीटर

हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयाचा दुसरं लग्न करणाऱ्या पतीला दणका, परदेशात घटस्फोट मिळाला म्हणजे भारतातील लग्न संपत नाही; दिला महत्वाचा आदेश

13 नोव्हेंबर रोजी तुमच्या शहरातील डिझेलच्या किंमती (प्रतिलिटर) :

नवी दिल्ली : 95.20 रुपये प्रति लीटर

मुंबई : 97.83 रुपये प्रति लीटर

चेन्नई : 99.55 रुपये प्रति लीटर

कोलकाता : 99.82 रुपये प्रति लीटर

बेंगळुरू : 99.56 रुपये प्रति लीटर

हैदराबाद : 104.23 रुपये प्रति लीटर

नोएडा : 95.56 रुपये प्रति लीटर

भारतात इंधन दर कमी :

जागतिक सरासरीच्या तुलनेत भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी आहेत. पेट्रोलची जागतिक सरासरी किंमत प्रति लिटर 145.86 रुपये इतकी आहे, तर भारतात ती किंमत प्रति लिटर 108.65 रुपये आहे. डिझेलच्या बाबतीत जागतिक सरासरी किंमत प्रति लिटर 155.87 रुपये आहे, तर भारतात ती प्रति लिटर 98.10 रुपये इतकी आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES