England VS Sri Lanka : जगात क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. क्रिकेटचे फॅन्स स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्यासाठी एक पर्याय वापरतात आणि तिकिटं मिळवण्याचा जुगाड करून सामना पाहण्यासाठी जातात. इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात गुरुवारी सामना पार पडला. या वनडे सामन्यात श्रीलंकेचा 2 विकेटने विजय झाला. या सामन्यादरम्यान एका लहान मुलाने हातात पोस्ट घेतले होते, त्यावरचा मजकूर वाचून सर्वांनाच धक्का बसला सर्व हसू लागले. लहानग्या मुलाने हातात धरलेल्या पोस्टरवर लिहिले होते की, 'या सीटवर बसून सामना पाहण्यासाठी मी माझ्या बहिणीचा फोन विकला'. सध्या या पोस्टरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
22 ऑक्टोबर रोजी रावलपिंडी येथे इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना खेळवला होता. याच सामन्यादरम्यान एका तरुण चाहत्याने धरलेल्या एका पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले त्यावर असे लिहिले होते की, या जागा मिळवण्यासाठी त्याने आपल्या बहिणीचा फोन विकला होता. मुलाच्या पोस्टरवर लिहिले होते, 'या जागा मिळवण्यासाठी मी माझ्या बहिणीचा फोन विकला'. पोस्टरवरील हे वाक्य लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. मुलाने आपला संदेश अशा प्रकारे मांडला होता की, ज्याने कोणी तो पाहिला, त्याचे लक्ष लगेच त्याकडे गेले.
"Must have been a cheap phone" https://t.co/jcq3szomgh
Sky Sports Cricket (SkyCricket) October 22, 2026
क्रिकेट सामन्यांदरम्यान चाहते अनेकदा आपल्या आवडत्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये पोस्टर्स घेऊन येतात. या पोस्टर्सवर कधी विनोदी मेसेज असतात, तर कधी खेळाडूंसाठी काही खास संदेश लिहिलेले असतात. एका मुलाने हातात धरलेले एक पोस्टर सध्या त्याच्या अनोख्या संदेशामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी त्याने आपल्या बहिणीचा फोन विकून टाकला होता ज्यामुळे हा छोटा चाहता चर्चेचा विषय बनला.