• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /सॅण्डपेपर स्कँडल प्रकरणी डेव्हिड वॉर्नरचा मोठा खुलासा, म्हणाला 'क्रिकेट ऑस्ट्रेलियाला त्यांची खोटी कहाणी....'

सॅण्डपेपर स्कँडल प्रकरणी डेव्हिड वॉर्नरचा मोठा खुलासा, म्हणाला 'क्रिकेट ऑस्ट्रेलियाला त्यांची खोटी कहाणी....'

David Warner Sandpaper Scandle : 2018 च्या सॅण्डपेपर स्कँडल प्रकरणी माजी उस्मान ख्वाजाने आपल्या पुस्तकातून सनसनीखेज खुलासे केल्यावर आता याबाबत वाद पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे. पॅट कमिन्सच्या शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेनंतर डेव्हिड वॉर्नरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Reported Bypooja pawar
Published: Nov 14, 2026, 12:49 PM IST|Updated: Nov 14, 2026, 01:31 PM IST
joinshare
सॅण्डपेपर स्कँडल प्रकरणी डेव्हिड वॉर्नरचा मोठा खुलासा, म्हणाला 'क्रिकेट ऑस्ट्रेलियाला त्यांची खोटी कहाणी....'
Image Credit: सॅण्डपेपर स्कँडल प्रकरणी डेव्हिड वॉर्नरचा मोठा खुलासा, म्हणाला 'क्रिकेट ऑस्ट्रेलियाला त्यांची खोटी कहाणी....'

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

David Warner Sandpaper Scandle : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरने क्रिकेट ऑस्ट्रेलियावर टीका करत एक नवीन वक्तव्य केलं आहे. सॅण्डपेपर स्कँडल प्रकरणाचा वाद थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. 2018 च्या सॅण्डपेपर स्कँडलने आता पुन्हा एकदा वाद छेडला जेव्हा माजी क्रिकेटर उस्मान ख्वाजाने आपल्या पुस्तकातून सनसनीखेज खुलासा केला आणि सांगितलं की सॅण्डपेपर स्कँडलबाबत त्यावेळी संपूर्ण ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला माहित होतं. ख्वाजाच्या या वक्तव्याला लगेचच माजी क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरने समर्थन दिलं. मात्र सध्याचा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असलेल्या पॅट कमिन्सने शुक्रवारी 70 मिनिटांची पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की ख्वाजा द्वारे करण्यात आलेले सर्व दावे हे चुकीचे आणि मानहानी करणारे आहेत.

डेविड वॉर्नर पोस्टमध्ये काय म्हणाला?

डेव्हिड वॉर्नरने म्हटलं की  पॅट कमिन्सने कालची पत्रकार परिषद घेऊन उस्मान ख्वाजाला अडचणीत टाकलंय. त्याला उगाच त्यांनी 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'च्या सुरुवातीच्या तपासाचाही उल्लेख केला आणि त्याला 'अयोग्य पद्धतीने केलेली चौकशी' असे संबोधले. पर्थमध्ये इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या वनडे सामन्याच्या पार्श्वभूमीवर वॉर्नर म्हणाले, 'पॅट कमिन्स आज सकाळी पूर्ण तयारी करून आले होते, परंतु मी अजूनही ख्वाजाच्या बाजूने उभा आहे आणि त्याने आपल्या पुस्तकात जे काही लिहिले आहे, त्याचे समर्थन करतो'.

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 डेविड वॉर्नर पुढे म्हणाला की, 'हे खरे आहे आणि मी पूर्णपणे त्याच्या पाठीशी उभा आहे; सध्या मला त्याच्याबद्दल वाईट वाटत आहे. माझी मनापासून खात्री आहे की, आज कर्णधाराने ख्वाजाला एका कठीण परिस्थितीत आणून ठेवले आहे आणि या गोष्टीमुळे मला अत्यंत निराशा झाली आहे'. सोशल मीडियावर शनिवारी डेव्हिड वॉर्नरने एक पोस्ट लिहिली ज्यात त्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला निशाणा बनवलं होतं. त्याने लिहिलं, 'जोपर्यंत मला ज्ञात आहे की 2018 मध्ये जेव्हा चौकशी झाले तेव्हा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जोश हेजलवुड, मिशेल स्टार्क आणि नाथन लियोन यांची चौकशी केली नाही'.

हेही वाचा : 17 वर्षीय महिला क्रिकेटरने स्वतःला संपवलं, कारण ऐकून धक्काच बसेल, क्रिकेट विश्व हळहळलं

वॉर्नर त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला की, 'जर हे खरे असेल, तर क्रिकेट ऑस्ट्रेलिया असा दावा कसा करू शकते की गोलंदाजांना याबद्दल काहीही माहीत नव्हते? असे वाटते की, कोणाला जबाबदार धरायचे हे त्यांनी सुरुवातीपासूनच ठरवून ठेवले होते. त्यांनी स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी अत्यंत सदोष तपास केला आणि आता त्यांना ही खोटी कहाणी कायम ठेवायची आहे की, गोलंदाजांना याबद्दल काहीही माहीत नव्हते', असे वॉर्नरने पुढे लिहिले आणि जोडले, 'हे स्पष्टपणे काहीतरी लपवण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते'. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Cricket News
Team india