सॅण्डपेपर स्कँडल प्रकरणी डेव्हिड वॉर्नरचा मोठा खुलासा, म्हणाला 'क्रिकेट ऑस्ट्रेलियाला त्यांची खोटी कहाणी....'
David Warner Sandpaper Scandle : 2018 च्या सॅण्डपेपर स्कँडल प्रकरणी माजी उस्मान ख्वाजाने आपल्या पुस्तकातून सनसनीखेज खुलासे केल्यावर आता याबाबत वाद पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे. पॅट कमिन्सच्या शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेनंतर डेव्हिड वॉर्नरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
David Warner Sandpaper Scandle : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरने क्रिकेट ऑस्ट्रेलियावर टीका करत एक नवीन वक्तव्य केलं आहे. सॅण्डपेपर स्कँडल प्रकरणाचा वाद थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. 2018 च्या सॅण्डपेपर स्कँडलने आता पुन्हा एकदा वाद छेडला जेव्हा माजी क्रिकेटर उस्मान ख्वाजाने आपल्या पुस्तकातून सनसनीखेज खुलासा केला आणि सांगितलं की सॅण्डपेपर स्कँडलबाबत त्यावेळी संपूर्ण ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला माहित होतं. ख्वाजाच्या या वक्तव्याला लगेचच माजी क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरने समर्थन दिलं. मात्र सध्याचा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असलेल्या पॅट कमिन्सने शुक्रवारी 70 मिनिटांची पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की ख्वाजा द्वारे करण्यात आलेले सर्व दावे हे चुकीचे आणि मानहानी करणारे आहेत.
डेविड वॉर्नर पोस्टमध्ये काय म्हणाला?
डेव्हिड वॉर्नरने म्हटलं की पॅट कमिन्सने कालची पत्रकार परिषद घेऊन उस्मान ख्वाजाला अडचणीत टाकलंय. त्याला उगाच त्यांनी 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'च्या सुरुवातीच्या तपासाचाही उल्लेख केला आणि त्याला 'अयोग्य पद्धतीने केलेली चौकशी' असे संबोधले. पर्थमध्ये इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या वनडे सामन्याच्या पार्श्वभूमीवर वॉर्नर म्हणाले, 'पॅट कमिन्स आज सकाळी पूर्ण तयारी करून आले होते, परंतु मी अजूनही ख्वाजाच्या बाजूने उभा आहे आणि त्याने आपल्या पुस्तकात जे काही लिहिले आहे, त्याचे समर्थन करतो'.
डेविड वॉर्नर पुढे म्हणाला की, 'हे खरे आहे आणि मी पूर्णपणे त्याच्या पाठीशी उभा आहे; सध्या मला त्याच्याबद्दल वाईट वाटत आहे. माझी मनापासून खात्री आहे की, आज कर्णधाराने ख्वाजाला एका कठीण परिस्थितीत आणून ठेवले आहे आणि या गोष्टीमुळे मला अत्यंत निराशा झाली आहे'. सोशल मीडियावर शनिवारी डेव्हिड वॉर्नरने एक पोस्ट लिहिली ज्यात त्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला निशाणा बनवलं होतं. त्याने लिहिलं, 'जोपर्यंत मला ज्ञात आहे की 2018 मध्ये जेव्हा चौकशी झाले तेव्हा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जोश हेजलवुड, मिशेल स्टार्क आणि नाथन लियोन यांची चौकशी केली नाही'.
हेही वाचा : 17 वर्षीय महिला क्रिकेटरने स्वतःला संपवलं, कारण ऐकून धक्काच बसेल, क्रिकेट विश्व हळहळलं
वॉर्नर त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला की, 'जर हे खरे असेल, तर क्रिकेट ऑस्ट्रेलिया असा दावा कसा करू शकते की गोलंदाजांना याबद्दल काहीही माहीत नव्हते? असे वाटते की, कोणाला जबाबदार धरायचे हे त्यांनी सुरुवातीपासूनच ठरवून ठेवले होते. त्यांनी स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी अत्यंत सदोष तपास केला आणि आता त्यांना ही खोटी कहाणी कायम ठेवायची आहे की, गोलंदाजांना याबद्दल काहीही माहीत नव्हते', असे वॉर्नरने पुढे लिहिले आणि जोडले, 'हे स्पष्टपणे काहीतरी लपवण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते'.