SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

IPL 2027 पूर्वी 'या' स्टार खेळाडूंची अदलाबदल, जाणून घ्या कोण, कुठे गेलं? संपूर्ण लिस्ट

IPL 2027 Trade Deal: आयपीएल 2027 पूर्वी अनेक स्टार खेळाडूंनी आपला संघ बदलला आहे. हार्दिक - अर्शदीप, कुलदीप - ऋषभ सारखे अनेक खेळाडूंनी ट्रेड डीलच्या माध्यमातून आपले संघ बदलले आहेत. तेव्हा कोणता खेळाडू ट्रेड होऊन कोणत्या संघात गेला आहे याविषयी जाणून घेऊयात.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 12, 2026, 06:31 IST | Updated: Nov 12, 2026, 07:23 IST
Image Credit: IPL 2027 पूर्वी 'या' स्टार खेळाडूंची अदलाबदल, जाणून घ्या कोण, कुठे गेलं? संपूर्ण लिस्ट
Join

IPL 2027 Trade Deal: आयपीएल 2027 च्या नव्या सीजनसाठी फॅन्समध्ये मोठी उत्सुकतता आहे. येत्या 17 नोव्हेंबरपर्यंत बीसीसीआयने आयपीएलच्या सर्व संघांना त्यांच्या रिटेन, रिलीज खेळाडूंची नाव जाहीर करण्यास सांगितली आहेत. त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या मध्याला आयपीएल 2027 साठीचं मिनी ऑक्शन गोव्यात पार पडेल. त्याच्यापूर्वी एक आठवडाआधी ट्रेडिंग विंडो खुली राहणार आहे. आतापर्यंत आयपीएल 2027 पूर्वी अनेक मोठे ट्रेड समोर आलेले आहेत. तेव्हा आतापर्यंत आयपीएल 2027  पूर्वी कोणत्या खेळाडूंनी ट्रेड डीलद्वारे संघ बदलला आहे याविषयी माहिती करून घ्या.

हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंह :

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात बुधवारी 11 नोव्हेंबर रोजी ही ट्रेड जाई असून या माध्यमातून मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार हार्दिक पंड्या हा 18 कोटींच्या मानधनासह पंजाब किंग्समध्ये गेला आहे. यापूर्वी मागच्या सीजनमध्ये हार्दिकला 16.35 कोटी रुपये दिले गेले होते. हार्दिकच्या बदल्यात अर्शदीप सिंह हा 18 कोटींच्या मानधनासह मुंबई इंडियन्समध्ये ट्रेड झाला आहे.

ऋषभ पंत आणि कुलदीप यादव :

आयपीएल 2026 नंतर लखनऊ सुपर जाएंट्सचा कर्णधार असलेला ऋषभ पंत हा दिल्ली कॅपिटल्समध्ये ट्रेड झाला. मात्र हा पंतसाठी नुकसानीचा सौदा ठरला. ऋषभ पंतला आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये लखनऊने 27 कोटींना विकत घेतलेलं, ज्यामुळे तो आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला. मात्र आता पुन्हा ट्रेड होताना दिल्ली कॅपिटल्समध्ये ऋषभ पंत हा 15 कोटींच्या मानधनावर सामील झालाय. तर त्याच्या बदल्यात दिल्ली कॅपिटल्समधून कुलदीप यादव हा 13.25 कोटींच्या मानधनावर लखनऊ सुपर जाएंट्सकडे गेला आहे.

हेही वाचा : हार्दिक पांड्याने सोडली साथ, आता मुंबई इंडियन्सचा पुढचा कर्णधार कोण? 4 नावं शर्यतीत

टी. नटराजन आणि जीशान अंसारी :

टी. नटराजन हा आयपीएल 2027  पूर्वी दिल्ली कॅपिटल्समधून सनरायजर्स हैदराबादमध्ये ट्रेड झाला आहे. मागच्या सीजनमध्ये त्याला दिल्लीकडून 10.75 कोटींचे मानधन मिळत होते, मात्र आता त्याला आगामी सीजनसाठी 5 कोटी इतकेच मानधन मिळणार आहे. तर जीशान अंसारी हा त्याबदल्यात सनरायजर्स हैदराबादमधून  40 लाखांच्या किंमतीवर दिल्ली कॅपिटल्समध्ये ट्रेड झाला आहे.

चेन्नई आणि हैदराबादमध्ये चार खेळाडूंचा ट्रेड :

लियाम लिविंगस्टोन: सनरायजर्स हैदराबादकडून चेन्नई सुपर किंग्स – 6 कोटी रुपये (आधीचं मानधन 13 कोटी रुपये)
जॅक एडवर्ड्स : सनरायजर्स हैदराबादकडून  चेन्नई सुपर किंग्स – 3 कोटी रुपये
खलील अहमद : चेन्नई सुपर किंग्सकडून सनराइजर्स हैदराबाद – 4.8 कोटी रुपये
नाथन एलिस : चेन्नई सुपर किंग्सकडून सनराइजर्स हैदराबाद – 2 कोटी रुपये

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES