SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

हार्दिक पांड्या पंजाब किंग्समध्ये जाणार? बदल्यात मुंबई इंडियन्सला मिळणार दोन स्टार खेळाडू

Hardik Pandya Trade Deal With Punjab Kings : पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हार्दिक पांड्याच्या ट्रेड विषयी बातचीत खूप पुढे गेली असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे. हार्दिकच्या बदल्यात पंजाब किंग्सचे दोन स्टार खेळाडू हे मुंबई इंडियन्समध्ये ट्रेड होऊन येणार आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 03, 2026, 02:48 PM IST | Updated: Nov 03, 2026, 03:24 PM IST
Image Credit: हार्दिक पांड्या पंजाब किंग्समध्ये जाणार?
Join

Hardik Pandya Trade Deal With Punjab Kings : इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी सीजन विषयी मोठी उत्सुकतात निर्माण झाली आहे. बीसीसीआयने 17 नोव्हेंबर पर्यंत सर्व आयपीएल फ्रेंचायझींना त्यांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर करण्यास सांगितलं आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या हा आगामी सीजनपूर्वी मुंबई इंडियन्समधून बाहेर पडेल अशी चर्चा सुरु आहे. मुंबईचा संघ अनेक आयपीएल संघांशी हार्दिकच्या ट्रेड डीलबाबत चर्चा करत आहे. अशातच पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हार्दिक पांड्याच्या ट्रेड विषयी बातचीत खूप पुढे गेली असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. स्पोर्टस्टारला मिळालेल्या माहितीनुसार स्टार गोलंदाज अर्शदीप सिंह आणि विकेटकिपर फलंदाज विष्णु विनोद हे हार्दिकच्या बदल्यात मुंबई इंडियन्समध्ये जाण्याची शक्यता आहे. 

हार्दिकच्या बदल्यात कोण?

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघाचं सिनियर मॅनेजमेंट या प्रस्तावित ट्रेडसाठी जवळपास राजी झाला आहे. याची घोषणा आता 17 नोव्हेंबरच्या आदल्या आठवड्याच्या अंतापर्यंत केली जाईल. या करारासाठी  पुढाकार मुंबई इंडियन्सकडून घेण्यात आली होती. पंजाब किंग्सलाही त्यांच्या संघात सामना जिंकून देऊ शकेल अशा ऑलराऊंडर खेळाडूची गरज होती. हार्दिकशी संबंधित प्रस्तावावर पंजाब किंग्सने सहमती दर्शवल्यानंतर, चर्चेचा ओघ अर्शदीप आणि विष्णू यांच्या दिशेने वळला.

केकेआर सोबत का झाली नाही डील?

मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या ट्रेड विषयी वेगवेगळ्या तीन फ्रेंचायझींशी बातचीत करत होती. मात्र त्यांच्या एका सोबत सुद्धा ही डील  फायनल झाली नाही. पंजाब किंग्स शिवाय कोलकाता नाईट रायडर्स हा एकमेव संघ होता ज्या सोबत मुंबई इंडियन्सचं हार्दिक विषयी बोलणं खूप पुढे पोहोचलं होतं. मात्र कोलकाता नाईट रायडर्स हार्दिक पांड्याच्या बदल्यात हर्षित राणा आणि अंगकृष रघुवंशी या दोघांना मुंबई इंडियन्सकडे ट्रेड करण्यासाठी तयार नव्हता.

हेही वाचा : IPL 2027 साठी प्लेअर रिटेंशनच्या मुदतीत वाढ, संघांना 'या' तारखेपर्यंत जाहीर करावी लागणार यादी

पंजाब किंग्सने अर्शदीपसाठी खर्च केले 18 कोटी रुपये :

2025 च्या मेगा लिलावापूर्वी पंजाब किंग्सने अर्शदीप सिंगला संघातून मुक्त केले होते. परंतु नंतर 'राईट टू मॅच' कार्डचा वापर करून त्याला पुन्हा संघात परत आणले. सनरायझर्स हैदराबादने त्याच्यासाठी 15.75 कोटी रुपयांची बोली लावली होती, मात्र त्यानंतर 18 कोटी रुपयांची बोली लागल्यामुळे अर्शदीप सिंग पुन्हा पंजाब किंग्समध्ये सामील झाला. सनरायझर्स हैदराबादने आपली यशस्वी बोली वाढवून 15.75 कोटी रुपये केली, त्यानंतर 18 कोटी रुपयांची बोली लावली गेली आणि अर्शदीप सिंग पुन्हा पंजाब किंग्समध्ये परतला. मात्र आता मुंबई सोबत ट्रेड डील निश्चित झाली तर हार्दिकच्या बदल्यात अर्शदीप सिंह हा मुंबई इंडियन्सचा भाग होईल. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES