SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

हॉंगकॉंग सिक्सेसमध्ये पाकिस्तानला पराभूत केल्यावर शहबाज शरीफचं बालिश वर्तन, आकाश चोप्राने केलं ट्रोल

Hong Kong Sixes : हॉंगकॉंग सिक्सेसमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव करून सामना जिंकला आणि त्यामुळे पाक पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी खुश होऊन सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. मात्र त्यांना या पोस्टवरून मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 31, 2026, 12:25 PM IST | Updated: Oct 31, 2026, 01:02 PM IST
Image Credit: hong kong sixes
Join

Hong Kong Sixes : हॉंगकॉंग सिक्सेसमध्ये भारतीय संघाला पाकिस्तान विरुद्ध 4 विकेटने पराभव मिळाला. या विजयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफहे खूप खुश झाले आणि त्यांच्या एक्स हॅन्डलवरून त्यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाचे अभिनंदन केले. मात्र यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले आहेत.

पंतप्रधान शहबाज शरीफने पाकिस्तान संघाविषयी आपल्या एक्स हॅण्डलवर लिहिले की, 'हाँगकाँग सिक्ससमध्ये भारतावर पाकिस्तानच्या 4 विकेट राखून मिळालेल्या विजयाबद्दल सर्व खेळाडूंचे अभिनंदन. हा एक उत्तम क्रिकेट सामना होता. पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी आणि त्यांच्या टीमचे, त्यांनी केलेल्या तयारीबद्दल तसेच खेळाडूंना दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी कौतुक करतो'.

आकाश चोपडाने शहबाजला केलं ट्रोल :

माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने या पोस्टवरून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना ट्रोल केले. शाहबाज शरीफ यांना टॅग करत आकाश चोप्राने लिहिले, 'आम्ही भारताचा पराभव केला असे म्हणण्याची तुम्हाला इतकी घाई होती की, तुम्ही वस्तुस्थिती तपासण्याची तसदीही घेतली नाही. त्यांचा पहिला सामना ते यूएई विरुद्ध हरले आणि खरं तर, पाकिस्तान सध्या कोणत्या स्तरावर खेळत आहे, याचा अंदाज तुम्ही यावरूनच लावू शकता की, त्या देशाचे पंतप्रधान 'हाँगकाँग सिक्सस' स्पर्धेबद्दल ट्विट करत आहेत. म्हणजे, खरंच!!!'

हेही वाचा : आकिब नबीची टीम इंडियात निवड! 2 ऐवजी आता 5 वनडे खेळणार, पाहा भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरिजसाठी भारतीय संघ

टीम इंडियाचा 4 विकेटने झाला पराभव :

हाँगकाँग सिक्सस स्पर्धेत टीम इंडियन  शशांक सिंहच्या 11 बॉल आणि 40 धावांच्या जोरावर 6 ओव्हरमध्ये 88 धावा केल्या. शशांकने त्याच्या इनिंगमध्ये एकूण  5 सिक्स लगावले होते. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने हा सामना 4 विकेट राखून जिंकला. यात अब्बास आफ्रिदीने 8 बॉलवर 35 धावा केल्या, तर ख्वाजा नाफेने 12 बॉलमध्ये नाबाद 41 धावांचे योगदान दिले. या डावादरम्यान अब्बासने कृणाल पांड्याच्या एका ओव्हर सलग पाच सिक्सही लगावले. अखेरीस पाकिस्तानने अवघ्या 3.5 ओव्हर 2 विकेट गमावून 91 धावा करत विजयाचं टार्गेट पूर्ण केलं. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES