ICC Ranking : आयसीसी पुरुष वनडे टीम रँकिंगमध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघ सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. हा संघ श्रीलंकेच्या पुढे गेला आहे. ही त्यांची आतापर्यंतची सर्वोच्च रँकिंग आहे. भारतीय क्रिकेट संघ 4122 गुण आणि 115 रेटिंगसह अव्वल स्थानावर कायम आहे. न्यूझीलंड 3809 गुण आणि 109 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट संघात 2009 मध्ये आपला पहिला वनडे सामना खेळला होता. आता 17 वर्षांमध्ये त्याचा प्रवास हा चांगला राहिला. फक्त वनडे नाही तर टी20 मध्ये प्रोग्रेस स्पष्ट दिसून आली. 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये त्यांनी पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव केला. 2024 मध्ये ते पहिल्यांदाच टी20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनल सामन्यापर्यंत पोहोचले. या काळात संघाने इतरही अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले. आयसीसीने सांगितलं की अफगाणिस्तान क्रिकेट संघाने 191 वनडे सामन्यापैकी 96 सामन्यात त्यांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानचा संघ इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि बांगलादेशसारख्या संघांच्या आधीच पुढे होता आता त्याने श्रीलंकेला मागे टाकून ते सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत.
काही दिवसांपूर्वी खेळण्यात आलेल्या सीरिजबाबत बोलायचं झालं तर आयर्लंड विरुद्ध 4-0 ने सीरिज जिंकली आहे. झिम्बाब्वे आणि बांगलादेश सोबत झालेल्या ट्रे सीरिजमध्ये कोणीही सामन्यात पराभूत झालेला नाही. आयसीसी पुरुष वनडे टीम रँकिंगमध्ये टॉपवर भारत आहे तर दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड आहे. 104 रेटिंग आणि ऑस्ट्रेलियाच्या 102 रेटिंग पॉइंट्स आहे. ही संघ टॉप 5 मध्ये आहे.
आईसीसी वनडे संघाची रँकिंग :
भारत
न्यूझीलंड
साउथ अफ्रीका
पाकिस्तान
ऑस्ट्रेलिया
अफगानिस्तान
श्रीलंका
इंग्लंड
बांग्लादेश
वेस्टइंडीज