SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात पावसाचा खोडा! तिसऱ्या सामन्याच्या टॉसला उशीर, पाहा Weather Updates

IND VS NZ 3rd Match Weather Reports : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात पावसाने खोडा घातला असून यामुळे तिसऱ्या सामन्याच्या टॉसला उशीर झालेला आहे. त्यामुळे पहिल्या सामन्याप्रमाणेच तिसऱ्या सामन्यावर सुद्धा पावसाचा परिणाम पाहायला मिळेल.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 10, 2026, 07:48 IST | Updated: Nov 10, 2026, 08:20 IST
Image Credit: भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात पावसाचा खोडा! तिसऱ्या सामन्याच्या टॉसला उशीर, पाहा Weather Updates
Join

IND VS NZ 3rd Match Weather Reports : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची सीरिज खेळवली जात असून यातील तिसरा वनडे सामना हा मंगळवार 10 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. सकाळी 7: 30 च्या सुमारास तिसऱ्या सामन्याला सुरुवात होणार होती तर 7 वाजता या सामन्याचा टॉस पार पडणार होता. मात्र सामना सुरु होण्यापूर्वीच सेडन पार्क येथे पाऊस पडला त्यामुळे सामना सुरु होण्यास उशीर होत आहे. बातमी लिहीपर्यंत सामन्याचा टॉस देखील झाला नव्हता. तेव्हा तिसऱ्या सामन्यात सुद्धा पावसाने खोडा घातला आहे. तेव्हा आज सामना होत असलेल्या ठिकाणी हवामान कसं असणार आहे याबाबत रिपोर्ट जाणून घेऊयात.

पहिल्या वनडे सामन्यात सुद्धा पावसाने खोडा घातलेला. मात्र सामन्यात भारतीय संघाने सुधारित लक्ष्य गाठत DLS पद्धतीनुसार 5 विकेट्स राखून विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यातही भारताने DLS पद्धतीनुसारच 4 धावांनी विजय मिळवला.

कसं आहे हॅमिल्टन येथील हवामान?

न्यूझीलंडच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजता सामन्याला सुरुवात होणार होती. मात्र रिपोर्ट्सनुसार सामना सुरु होण्याच्या वेळी म्हणजेच जवळपास 3 वाजता 75 टक्के पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर सुद्धा पावसामुळे व्यत्यय येणे सुरूच राहू शकते. सामन्यावर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता या सामन्याचा टॉस पार पडणार होता. मात्र त्यानंतर टॉसला उशीर झाला आणि तो 7: 30  वाजता घेण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र मैदानात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि पुन्हा मैदानात कव्हर्स टाकण्यात आले. पावसाच्या व्यत्ययामुळे दोन्ही संघांच्या सरावावर सुद्धा परिणाम झाला होता. 

हेही वाचा : काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर यांच्या विवाह कार्यक्रमांना सुरुवात, ग्रँड विवाहाची तयारी पाहून थक्क व्हाल

भारतीय संघ :

रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), नमन धीर, अंशुल कंबोज, औकिब नबी, गुरनूर बराड़, अर्शदीप सिंह, ऋतुराज गायकवाड़, मोहम्मद सिराज, ईशान किशन, कुलदीप यादव.

न्यूझीलंडचा संघ :

विल यंग, ​​टिम सीफर्ट, हेनरी निकोल्स, डेरिल मिचेल, टॉम लैथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिशेल सैंटनर (कर्णधार), नाथन स्मिथ, काइल जैमीसन, जैकब डफी, मैथ्यू फिशर, क्रिस्टियन क्लार्क, माइकल ब्रेसवेल, निक केली.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES