IND VS NZ 4th ODI Gurnoor Brar Fight : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे सीरिज खेळवली जात आहे. शुक्रवार 13 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात आलेल्या चौथ्या वनडे सामन्यात भारतीय गोलंदाज गुरनूर बरार आणि न्यूझीलंडचा फलंदाज टिम सीफर्ट यांच्यात भर मैदानात राडा पाहायला मिळाला. यावेळी मैदानातील वातावरण चिघळताना पाहून विराट कोहलीने मध्यस्थी केली आणि तो गुरनूरला बाजूला घेऊन गेला. यावेळी मैदानातील अंपायर सुद्धा चिडलेले पाहायला मिळाले. सध्या याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
गुरनूर बरारने टिम सीफर्टला केलं बाद :
भारताची गोलंदाजी सुरु असताना पॉवर प्ले दरम्यान टिम सीफर्ट आणि भारताचा गोलंदाज गुरनूर बरार यांच्यात बाचाबाची झाली. गुरनूरच्या एकाच ओव्हरमध्ये एक सिक्स आणि दोन चौकार लगावत 14 धावा न्यूझीलंडच्या फलंदाजाने केल्या. महागडा ठरल्यानंतर ब्रारला गोलंदाजीवरून हटवण्यात आले होते. मात्र, सुरुवातीच्या पॉवरप्लेनंतर जेव्हा त्याला पुन्हा बॉल सोपवण्यात आला, तेव्हा त्याने एका वेगवान बाउन्सरद्वारे हिशोब चुकता केला. 42 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण करून धोकादायक ठरत असलेला सायफर्ट या शॉर्ट बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत होता. परंतु बॉल त्याच्या बॅटच्या वरच्या कडेला लागून हवेत उडाला आणि विकेटकिपर इशान किशनने एक उत्कृष्ट कॅच घेतला.
गुरनूरला राग झाला अनावर :
टिम सीफर्टची विकेट घेतल्यावर गुरनूर बरारचा जोश एका उंचीवर पोहोचला. त्याने थेट टिम सीफर्टच्या जवळ जाऊन आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केलं. या सेंडऑफमुले टिम सीफर्ट नाराज झाला आणि तो गुरनूर सोबत यावरुन वाद घालू लागला. हे भांडण आणखीन चिघळेल त्यापूर्वी विराट कोहलीने मध्यस्थी केली आणि तो गुरनूरला बाजूला घेऊन गेला. यावेळी मैदानावर अधिकतर आक्रमक राहणाऱ्या विराटला यावेळी सामंजस्याची भूमिका निभावताना पाहून सर्वजण पाहत राहिले.
https://t.co/aGkKEXoJ6q
भारताचा 244 धावांनी पराभव :
टीम इंडियालंका विजयासाठी न्यूझीलंडने 334 धावांचे आव्हान दिले होते. मात्र हे आव्हान पूर्ण करण्यात भारतीय फलंदाजी फेल ठरली. विराट कोहली, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या तिघांना भोपळा सुद्धा फोडता आला नाही. त्यानंतर ईशान किशनने 27, अक्षर पटेलने 21, नमन धीरने 21 धावा अशी कामगिरी केली, परंतू न्यूझीलंडने 89 धावांवर भारतीय फलंदाजांना सर्वबाद केलं आणि 244 धावांनी सामना जिंकला.