हवेत उडून ऋतुराज गायकवाडने पकडला जबरदस्त कॅच, सगळे पाहतच राहिले, Video Viral
IND VS NZ 5th ODI Match : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात आलेल्या वनडे सीरिजमधील पाचव्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने न्यूझीलंडच्या ओपनर फलंदाजाची जबरदस्त कॅच घेऊन विकेट घेतली. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
IND VS NZ 5th ODI Match : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात माउंट माउंगानुई येथे रविवार 15 नोव्हेंबर रोजी वनडे सामना खेळवला जाणार आहे. या पाचव्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारताने सुरुवातीला फलंदाजी करून विजयासाठी न्यूझीलंडला 210 धावांचे आव्हान दिले. लहान लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाला न्यूझीलंडच्या लवकरात लवकर विकेट घेऊन त्यांना ऑलआउट करणं गरजेचं होतं. यावेळी अर्शदीप सिंहने टाकलेल्या बॉलवर न्यूझीलंडचा सध्या फॉर्मात असलेल्या विल याँगने फटका मारला. बॉल सीमारेषेच्या बाहेरच जात होता, मात्र तेवढ्यात ऋतुराज गायकवाडने जबरदस्त कॅच पकडली आणि त्याने भारताला दुसरं यश मिळून दिली. ऋतुराज गायकवाडने घेतलेल्या या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
17 व्या ओव्हरमध्ये अर्शदीपच्या बाउंसलवर गेली विकेट :
न्यूझीलंडच्या डावातील 17 व्या ओव्हरमध्ये हा रोमांचक कॅच पाहायला मिळाला. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने विल याँगला एक अचूक आणि वेगवान बाउन्सर टाकला. आपल्या संपूर्ण डावात 'पुल शॉट' खेळत असलेल्या विल यंगने यावेळीही तोच फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु बॉल सीमारेषेच्या जवळ तैनात असलेल्या क्षेत्ररक्षकापासून तो दूर ठेवण्यात तो अपयशी ठरला.
डीप बॅकवर्ड स्क्वेअरवर उभा असलेला ऋतुराज गायकवाडने बॉल हवेत असल्याचे पाहताच वेगाने आपल्या उजव्या बाजूला धावला. बऱ्यापैकी अंतर कापून बाउंड्री रोपजवळ त्याने उडी घेतली आणि हवेत पूर्णपणे झोकून देत दोन्ही हातांनी जबरदस्त कॅच पकडला. या विकेटमुळे भारताला मोठा दिलासा मिळाला, कारण विल याँगने मागील सामन्यात शानदार शतक झळकावले होते.
हेही वाचा : पाकिस्तानला धूळ चरत U19 आशिया कप जिंकणाऱ्या टीम इंडियाला किती प्राईज मनी मिळणार? BCCI ने केलं स्पष्ट
न्यूझीलंडची प्लेईंग 11 :
विल याँग, टिम सायफर्ट (विकेटकिपर), निक केली, डीन फॉक्सक्रॉफ्ट, फिन ॲलन, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), ख्रिस्टियन क्लार्क, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, मॅथ्यू फिशर
भारताची प्लेईंग 11 :
रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, श्रेयस अय्यर (कर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, नमन धीर, औकिब नबी, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, यश ठाकूर