IPL 2027 मिनी ऑक्शनच्या तारखेची घोषणा, 'या' दिवशी गोव्यात होणार आयोजन
IPL 2027 Auction Dates : इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी 20 व्या सीजनचं मिनी ऑक्शन हे गोव्यात पार पडणार अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर आता हे ऑक्शन नेमकं कधी होणार याची तारीख सुद्धा मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलेली आहे.
IPL 2027 Auction Dates : इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठी टी20 लीग असून पुढील वर्षी याचा 20 वा सीजन पार पडणार आहे. आयपीएल 2027 साठी मिनी ऑक्शन यंदा गोव्यात पार पडणार अशी घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेली. आता या मिनी ऑक्शनची तारीख सुद्धा समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार बीसीसीआयच्या लॉजिस्टिक्स टीमद्वारे पाठवण्यात आलेल्या व्हाट्सएप मेसेजद्वारे आयपीएल ऑक्शनच्या तारखेबाबतचा खुलासा झालेला आहे. आगामी मिनी ऑक्शनच्या तारखेबाबत आणि ठिकाणाबाबत कोणताही औपचारिक ईमेल फ्रेंचाइजी मालकांना किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सुद्धा पाठवण्यात आलेला नाही.
किती तारखेला होणार IPL 2027 मिनी ऑक्शन?
बीसीसीआयने जो व्हाट्सएप मेसेज पाठवला होता त्यात लिहिलेले की, आयपीएल 2027 साठी खेळाडूंचं ऑक्शन हे 16 डिसेंबर 2026 रोजी ITC ग्रँड गोवामध्ये होईल. ऑक्शनबाबतची माहिती देणारी बैठक 15 डिसेंबर 2026 रोजी होणार आहे. आयपीएलच्या अनेक फ्रँचायझींनी पुष्टता दिली आहे की त्यांना हा संदेश मिळालाय. बीसीसीआयद्वारे पाठवण्यात आलेल्या मेसेजचा हेतू असा की गोव्याला जाण्यासाठी लॉजिस्टिक आणि प्रवासाचं बुकिंग करण्यासाठी वेळ मिळू शकेल. आशा आहे की लवकरच आयपीएल मालक आणि CEO यांना याबाबत औपचारिक सूचना पाठवली जाईल. 16 डिसेंबर रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे सामना सुद्धा खेळवला जाणार आहे. त्यामुळे यामुळे आयपीएल ऑक्शनच्या तारखेत बदल होऊ शकतो, अशी शक्यता सुद्धा आहे.
ऑक्शनपूर्वी संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल :
इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी सीजनच्या ऑक्शनसाठी सर्व संघ आपापली तयारी करत आहेत. अनेक फ्रेंचायझींनी त्यांच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल केला आहे. शनिवारी मुंबई इंडियन्सचे हेड कोच महेला जयवर्धने हे पदावरून दूर झाले असून फ्रेंचाइजीला आता नव्या कोचचा शोध आहे. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने आपल्या नव्या कोचची नियुक्ती केली. दिल्लीचे हेड कोच सौरव गांगुली असून असिस्टंट कोच म्हणून युवराज सिंह हा आहे.
आयपीएलचे संघ :
चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टाइटंस, कोलकाता नाईट राइडर्स, लखनऊ सुपर जायंट्स, मुंबई इंडियंस, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु, सनराइजर्स हैदराबाद.