SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पॅट कमिन्स IPL 2027 चा संपूर्ण सीजन खेळणार नाही? SRH कर्णधारने दिली हिंट

IPL 2027 : सनरायजर्स हैदराबादच्या एका खेळाडूने कर्णधार पॅट कमिन्सच्या आयपीएल 2027 खेळण्यावर मोठे अपडेट्स दिले आहेत. आंतरराष्ट्रीय सीरिज आणि वर्ल्ड कपच्या तयारीसाठी पॅट कमिन्स आयपीएल 2027 चे सर्व सामने खेळणार नाही अशी माहिती समोर येत आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 22, 2026, 12:14 IST | Updated: Nov 22, 2026, 12:50 IST
Image Credit: पॅट कमिन्स IPL 2027 चा संपूर्ण सीजन खेळणार नाही? SRH कर्णधारने दिली हिंट
Join

IPL 2027 : आयपीएल 2027 सीजनची उत्सुकतता वाढत चालली आहे. सर्व संघांनी त्यांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची लिस्ट मागच्या मंगळवारीच जाहीर केली. मात्र सनरायजर्स हैदराबाद संघाच्या गोटातून मोठे अपडेट्स येत आहेत. सनरायजर्स हैदराबादच्या एका खेळाडूने कर्णधार पॅट कमिन्सच्या आयपीएल 2027 खेळण्यावर मोठे अपडेट्स दिले आहेत. बिझी शेड्युल आणि वनडे वर्ल्ड कपच्या तयारीसाठी यापूर्वीच मिचेल स्टार्क आणि ट्रेविस हेड हे दोघे आधीच आयपीएलचा आगामी सीजनमधून बाहेर पडले आहेत. दोघांना त्यांच्या फ्रेंचायझींनी रिलीज  केले आहे. मात्र पॅट कमिन्सला मात्र रिटेन केलं. त्यामुळे पॅट कमिन्स खेळणार असं बोललं जातंय, मात्र आता त्याच्या उपलब्धतेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार आहे. फ्रँचायझीने त्याला संघातून मुक्त न करण्याचा निर्णय घेतल्यावरून हे स्पष्ट होते की, तो आयपीएल 2027 मध्ये सहभागी होईल. मिळालेल्या माहितीनुसार कमिन्सने स्वतः आपण खेळणार असल्याचे निश्चित केले आहे. मात्र त्याने असेही संकेत दिले आहेत की तो कदाचित केवळ काही निवडक सामन्यांतच खेळू शकेल.

हेही वाचा : सर्वात मोठा स्कोअर, वर्ल्ड रेकॉर्ड पार्टनरशिप, न्यूझीलंड विरुद्ध 720 धावा करून भारताने केले 5 मोठे कारनामे

सनरायजर्स हैदराबादमधील एका वरिष्ठ खेळाडूने क्रिकबजशी बोलताना याबाबत माहिती दिली. पॅट कमिन्स सोबत झालेल्या संभाषणानुसार त्या वरिष्ठ खेळाडूने सांगितलं की, 'मी कमिन्सशी बोललो, आणि त्याने सांगितले की तो आयपीएल खेळण्यासाठी नक्कीच भारतात येईल. पूर्ण हंगामासाठी नाही, तरी किमान काही सामन्यांसाठी तरी तो नक्कीच येईल'. मागच्या सीजनमध्ये सुद्धा पॅट कमिन्स हा आयपीएलचे काहीच सामने खेळला होता. तेव्हा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याला खेळण्यासाठी परवानगी दिलेली नव्हती. तेव्हा पॅट कमिन्सने संपूर्ण सीजनमधील केवळ 8 सामने खेळले होते.

सनरायजर्स हैदराबाद रिटेन खेळाडूंची लिस्ट :

पॅट कमिंस,अभिषेक शर्मा, ईशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, ब्रायडन कार्स, सलिल अरोड़ा, अनिकेत वर्मा, हर्ष दुबे, आर स्मरण, प्रफुल हिंगे
साकिब हुसैन, शिवांग कुमार, क्रेंस फुलेत्रा, ईशान मलिंगा, टी नटराजन, नेथन एलिस, खलील अहमद.

सनरायजर्स हैदराबाद रिलीज खेळाडूंची लिस्ट : 
ट्रेस हेड, गेराल्ड कोएट्जी, जयदेव उनादकट, शिवम् मावी, आर अम्ब्रीश, कमिंडू मेंडिस, दिलशान मदुशंका, अमित कुमार, डेविड पेन, ओमकार तमाले

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES