SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

IPL 2027 पूर्वी सर्वात मोठी ट्रेड डील, ₹18 कोटींच्या खेळाडूंची अदलाबदल, मुंबई इंडियन्समध्ये नव्या भिडूची एंट्री

IPL 2027 Trade Deal : मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या ट्रेड डीलवर आता शिक्कामोर्तब झाला आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्समध्ये 18 कोटींच्या खेळाडूंची अदलाबदल झालेली आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 11, 2026, 10:27 IST | Updated: Nov 11, 2026, 11:16 IST
Image Credit: IPL 2027 पूर्वी सर्वात मोठी ट्रेड डील, ₹18 कोटींच्या खेळाडूंची अदलाबदल, मुंबई इंडियन्समध्ये नव्या भिडूची एंट्री
Join

IPL 2027 Trade Deal : मागील अनेक दिवसांपासून आयपीएल 2027 पूर्वी ज्या ट्रेड डीलची जोरदार चर्चा क्रिकेट विश्वात रंगली होती. ती ट्रेड डील आता अखेर पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन फ्रेंचायझीमध्ये झाली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याला पंजाब किंग्सकडे ट्रेड डीलद्वारे पाठवण्यात आलं असून पंजाब किंग्सने त्या बदल्यात गोलंदाज अर्शदीप सिंहला मुंबई इंडियन्सला ट्रेड केलं आहे. आयपीएलने स्वतः याबाबत अधिकृत परिपत्रक जाहीर करून घोषणा केली आहे. 

हार्दिक पांड्याला झाला कोट्यवधींचा फायदा :

हार्दिक पांड्या हा 2015 पासून मुंबई इंडियन्सचा भाग होता. मात्र त्यानंतर 2022 मध्ये तो गुजरात टायटन्समध्ये गेला. तेथे त्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. मात्र त्यानंतर आयपीएल 2024 मध्ये तो पुन्हा ट्रेड होऊन मुंबई इंडियन्समध्ये आला. त्याच्या येण्यानंतर रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिकला मुंबई संघाचा नवा कर्णधार करण्यात आले. मात्र त्याच्या नेतृत्वात संघाची कामगिरी चांगली ठरली नाही. आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळलेल्या शेवटच्या सामन्यात हार्दिकने मुंबई इंडियन्सची जर्सी काढून फेकून टाकलेली दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेली. त्यानंतरच हार्दिक पांड्या हा आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्स सोडणार अशी चर्चा होती. मागील काही दिवसांपासून हार्दिकच्या ट्रेड डीलबाबत मुंबई इंडियन्स पंजाब किंग्स यांच्यात ट्रेडबाबत चर्चा होती. अखेर हे डील आता फायनल झालं असून हार्दिक हा 18 कोटी रुपयांच्या मानधनावर पंजाब किंग्समध्ये सामील झालेला आहे.  जे त्याच्या सध्याच्या 16.35 कोटी रुपयांच्या मानधनापेक्षा जास्त आहे. 

अर्शदीप सिंहची मुंबई इंडियन्समध्ये एंट्री :

27 वर्षांचा गोलंदाज अर्शदीप सिंह याला मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे. हार्दिकच्या बदल्यात मुंबईने पंजाब किंग्सचा महागडा 
गोलंदाज आपल्याकडे घेतला आहे. अर्शदीप 18 कोटी रुपयांच्या आपल्या सध्याच्या मानधनावर मुंबई इंडियन्समध्ये सामील झालाय. अर्शदीपच्या येण्याने मुंबईचा गोलंदाजी अटॅक आणखीन मजबूत होईल. 17 नोव्हेंबर पर्यंत बीसीसीआयने सर्व फ्रेंचायझीला त्यांच्या रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे.  

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES