• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /वैभव सूर्यवंशीचं नशीब फळफळलं! दुसऱ्या सामन्यात मिळू शकते प्लेईंग 11 मध्ये संधी, ईशान किशन पडला बाहेर

वैभव सूर्यवंशीचं नशीब फळफळलं! दुसऱ्या सामन्यात मिळू शकते प्लेईंग 11 मध्ये संधी, ईशान किशन पडला बाहेर

IND VS NZ T20 : 24 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सीरिजमधील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यातून दुखापतीच्या कारणामुळे ईशान किशन बाहेर पडला असून यामुळे वैभव सूर्यवंशीला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.

Reported Bypooja pawar
Published: Oct 23, 2026, 01:59 PM IST|Updated: Oct 23, 2026, 02:33 PM IST
joinshare
वैभव सूर्यवंशीचं नशीब फळफळलं! दुसऱ्या सामन्यात मिळू शकते प्लेईंग 11 मध्ये संधी, ईशान किशन पडला बाहेर
Image Credit: वैभव सूर्यवंशीचं नशीब फळफळलं! दुसऱ्या सामन्यात मिळू शकते प्लेईंग 11 मध्ये संधी, ईशान किशन पडला बाहेर

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

IND VS NZ T20 : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात शनिवार 24 ऑक्टोबर रोजी हेगले ओव्हल स्टेडियममध्ये पाच सामन्यांच्या सीरिजमधील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला असून विकेटकिपर फलंदाज ईशान किशन हा दुखापतीमुळे दुसरा सामना खेळणार नाही. पहिल्या सामन्यात ईशानला दुखापत झालेली, त्याच्या तब्येतीवर बीसीसीआय लक्ष ठेऊन आहे अशी माहिती अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून देण्यात आली. मात्र ईशानच्या अनुपस्थितीमुळे वैभव सूर्यवंशीचं नशीब फळफळण्याची शक्यता असून त्याला दुसऱ्या सामन्यात प्लेईंग 11 मधून खेळण्याची संधी मिळू शकते.

बीसीसीआयने दिली माहिती :

बीसीसीआयने आपलं निवेदन जाहीर करत सांगितलं की, 'भारतीय विकेटकिपर फलंदाज ईशान किशन न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यातून बाहेर झाला आहे. पहिल्या टी20 सामन्यादरम्यान त्याच्या उजव्या पायाच्या स्नायूंवर ताण आला होता. इशानला उजव्या 'ॲडक्टर' स्नायूमध्ये किरकोळ दुखापत झाली आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे आणि त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देखरेख करत आहे'.

हेही वाचा : स्टेडियममध्ये येऊन सामना पाहण्यासाठी थेट बहिणीचा फोन विकला, पोस्टर व्हायरल

वैभव सूर्यवंशीला मिळणार संधी?

ईशान किशन दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला प्लेईंग 11 मध्ये जागा मिळवण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा फलंदाजी कोच सितांशू कोटकने सुद्धा ईशान किशनच्या दुखापतीबाबत माहिती देताना सांगितलं की पहिल्या टी20 सामन्यात तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला हे सुद्धा त्याच्या दुखापतीमुळेच झालं होतं. एका पत्रकार परिषदेत सितांशु कोटक म्हणाले, 'याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असल्याचं माझ्याही निदर्शनास आलं आहे. ईशानच्या मांडीच्या स्नायूंमध्ये ताण आला होता, म्हणूनच फलंदाजीच्या क्रमात बदल करण्यात आला होता. उद्याच्या सामन्यातही तो खेळण्याची शक्यता कमीच आहे. जर ईशान खेळला नाही, तर त्याच्या जागी खेळण्यासाठी वैभव हा नक्कीच एक प्रबळ दावेदार आहे'.

ईशान किशनच्या दुखापतीमुळे वैभव सूर्यवंशीचे संघात स्थान मिळवण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हे नियमित ओपनिंग करतील. टीम मॅनेजमेंट त्यांच्या कामगिरीवर समाधानी आहे. जर वैभवला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळाले तर संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो.

Ishan Kishan is ruled out of the second T20I against New Zealand due to a low grade right adductor strain, which he sustained during the first T20I of the series. The BCCI Medical Team is monitoring his progress. TeamIndia | NZvIND https://t.co/QbZpuVh1hQ

BCCI (BCCI) October 23, 2026

न्यूझीलंड सीरिजसाठी भारतीय संघ :

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकिपर), वैभव सूर्यवंशी, इशान किशन (विकेटकिपर), टिळक वर्मा (उपकर्णधार कर्णधार), अक्षर पटेल, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, वरूण कुमार, वरूण कुमार, अभिषेक शर्मा.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Team india
Marathi News
Cricket News
Ishan Kishan
Vaibhav Sooryavanshi