Mohammad Shami : आयपीएल 2027 साठी बीसीसीआयने सर्व फ्रेंचायझींना त्यांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची घोषणा करण्यासाठी 17 नोव्हेंबर ही तारीख दिली आहे. तसेच अजून आयपीएल ऑक्शनपूर्वी ट्रेड विंडो सुद्धा खुली असून अनेक खेळाडूंच्या ट्रेड संदर्भात काही चर्चा सुरु आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात मल्टीप्लेअर डील होण्याची शक्यता आहे. यात लखनऊ सुपर जाएंट्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि राजस्थान रॉयल्सचा इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम करनच्या नावाचा सुद्धा समावेश आहे. लखनऊ सुपर जाएंट्सचा स्पिनर मणिमारन सिद्धार्थ याला सुद्धा या या ट्रेडचा भाग बनवण्याचा विचार आहे.
यशस्वी जयस्वालच्या नावाची चर्चा :
सर्वात आश्चर्यकारक गोष्ट अशी की राजस्थान रॉयल्सचा स्टार ओपनर फलंदाज यशस्वी जयस्वालचं नाव आता समोर आलं आहे. जयस्वालच्या संदर्भात दोन्ही फ्रँचायझींमध्ये चर्चा झाली असून, राजस्थान संघाने त्याच्या बदल्यात लखनौकडून आणखी एका भारतीय वेगवान गोलंदाजाची मागणी केली आहे. जरी जयस्वालच्या बाबतीत दोन्ही संघांमध्ये अद्याप कोणताही अंतिम करार झालेला नसला, तरीही संबंधित खेळाडूंना या संभाव्य बदलाबाबत आधीच कल्पना देण्यात आली आहे.
मोहम्मद शमीला ट्रेड करण्यामागे खास रणनीती :
राजस्थान रॉयल्सच्या या रणनीतीच्या मागे एक खास योजना असल्याचं समजतंय. राजस्थानच्या संघात आधीच जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, तुषार देशपांडे, क्वेना मफाका आणि नांद्रे बर्गर यांसारखे वेगवान गोलंदाज आहेत. शमीला संघात घेऊन करून, राजस्थानचा प्रयत्न असा आहे की परदेशी खेळाडूंच्या कोट्यातून केवळ जोफ्रा आर्चरवरच वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सोपवावी. जेणेकरून इतर परदेशी खेळाडूंच्या जागा विशेष फलंदाज आणि ऑलराऊंडर खेळाडूंसाठी उपलब्ध होऊ शकतील.
सॅम करनच्या येण्याने लखनऊचा संघ होईल मजबूत :
लखनऊ सुपर जाएंट्ससाठी सुद्धा हा फायद्याचा ट्रेड आहे. कारण मोहम्मद शमी हा जवळपास 40 वर्षांचा असला तरी तो सामना पलटवण्याचा दम ठेवतो. मात्र तरी देखील लखनऊ संघ शमीला रिलीज करू शकतो. लखनौला आपल्या संघात समतोल साधण्यासाठी उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडूंची अत्यंत गरज आहे. त्यांची ही गरज सॅम करन ही गरज अगदी उत्तम प्रकारे पूर्ण करू शकतो.