SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

MS Dhoni ची आयपीएलमधून निवृत्ती! IPL 2027 पूर्वी CSK कडून मोठी जबाबदारी

MS Dhoni CSK Team Mentor : एम एस धोनीला सीएसके आगामी सीजनसाठी रिटेन करणार की रिलीज करणार याबाबत चर्चा होती. मात्र आयपीएल २०२७ साठी रिटेन खेळाडूंची लिस्ट जाहीर करण्यापूर्वी चेन्नई सुपरकिंग्सने आपल्या चाहत्यांना एक मोठी माहिती दिलीये.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 17, 2026, 14:55 IST | Updated: Nov 17, 2026, 15:37 IST
Image Credit: MS Dhoni ची आयपीएलमधून निवृत्ती? IPL 2027 पूर्वी CSK कडून मोठी जबाबदारी
Join

MS Dhoni CSK Team Mentor : आयपीएल 2027 पूर्वी बीसीसीआयने दिलेल्या मुदतीनुसार 17 नोव्हेंबरपर्यंत सर्व 10 फ्रेंचायझींना त्यांच्या संघातील रिटेन आणि रिलीज खेळाडूंची घोषणा करायची आहे. त्यानुसार संध्याकाळी 5 वाजल्यापासून आयपीएल संघांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची लिस्ट जाहीर होण्यास सुरुवात होईल. या सगळ्यात सर्वाधिक चर्चा मागील काही दिवसांपासून एम एस धोनीबाबत सुरु होती. एम एस धोनीला सीएसके आगामी सीजनसाठी रिटेन करणार की रिलीज करणार याबाबत चर्चा होती. मात्र आयपीएल 2027 साठी रिटेन खेळाडूंची लिस्ट जाहीर करण्यापूर्वी चेन्नई सुपरकिंग्सने आपल्या चाहत्यांना एक मोठी माहिती दिलीये. महेंद्र सिंह धोनी याला आगामी सीजनसाठी चेन्नई सुपरकिंग्सने टीम मेंटॉर म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे आयपीएल 2027 मध्ये एम एस धोनी खेळाच्या मैदानात खेळाडू म्हणून दिसणार नाही तर सीएसके संघासोबत मेंटॉर म्हणून दिसेल. एम एस धोनी हा आयपीएलमधून निवृत्त झाला आहे. 

काय म्हणाले CSK चे मालक एन. श्रीनिवासन? 

चेन्नई सुपरकिंग्सने मंगळवारी एम एस धोनीला टीम मेंटॉर म्हणून नवी जबाबदारी दिली आहे. चेन्नई सुपर किंग्सचे मालक एन. श्रीनिवासन यांनी फ्रँचायझीसाठी एम. एस. धोनीचे महत्त्व काय आहे, यावर भाष्य करताना म्हंटलं की, 'एम. एस. धोनीशिवाय सीएसके असूच शकत नाही. गेल्या दोन दशकांपासून आम्ही एकमेकांच्या सोबतीने वाटचाल केली आहे आणि प्रगती केली आहे. यात विजय, अपयश आणि त्या दरम्यानचे सर्व काही समाविष्ट आहे. आमचे नाते इतके भक्कम असण्यामागे एकच कारण आहे: आम्ही एकमेकांच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. याच विश्वासाने हा प्रवास शक्य केला आहे. 2008 मध्ये, मी आग्रह धरला होता की धोनी सीएसके (CSK) चा भाग असावा. तो माझा आतापर्यंतचा सर्वोत्तम निर्णय ठरला. केवळ त्याने फ्रँचायझीसाठी मिळवलेल्या यशांमुळेच नव्हे, तर तो माणूस म्हणून ज्या प्रकारचा आहे, त्यावरून हे सिद्ध होते. धोनी नेहमीच आमच्या ओळखीचा एक भाग असेल'.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES